Delhi: दिल्लीत एका अज्ञाताने एका 35 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात झाडली गोळी
Crime | (File Image)

Delhi: उत्तर-पूर्व दिल्लीतील सीलमपूर भागात शुक्रवारी अज्ञात व्यक्तीने एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या डोक्यात गोळ्या झाडल्या,  या घटनेची माहिती पोलिसांनी दिली होती. शाहनवाज असे पीडित तरुणाचे नाव असून तो न्यू सीलमपूर भागातील रहिवासी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. कबाडी मार्केट येथील ई-ब्लॉकमध्ये एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी झाडण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी पोहोचल्यावर शहानवाजच्या डोक्यात गोळी लागल्याचे दिसून आले. त्याला जेपीसी रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर एलएनजेपी रुग्णालयात रेफर करण्यात आले.

एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना सांगितले की, शाहनवाज रस्त्यावरून जात असताना एका मुलाने त्याच्यावर जवळून गोळी झाडली. "घटनास्थळी 7.65 मिमीची एक बुलेट सापडली आहे. सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले जात आहे आणि एफएसएल पथकांनी घटनास्थळी भेट दिली आहे," असे डीसीपी म्हणाले. "दोषींची ओळख पटवण्यासाठी आणि घटनेमागील कारणे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत," असे डीसीपी म्हणाले.