गुजरातमधील वडोदर येथे एका गावात गरब्याचे आयोजन केलेल्या ठिकाणी मगरीने अचानक उपस्थिती लावल्याने खळबल उडाली आहे. त्यामुळे गरब्यासाठी उपस्थित असलेल्या लोकांची मगरीला पाहून बोबडीच वळली आहे.
वडोदरा येथील पिपरिया या गावात शेरी गरब्याचे सोमवारी आयोजन करण्यात आले होते. या गरब्यादरम्यान सर्व उपस्थित मंडळी गरब्याचे आनंद घेत होते. मात्र अचानक तेथे पिसाळलेल्या मगरीने उपस्थिती लावली. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आणि गरब्यादरम्यान सर्वत्र आरडाओरड सुरु झाली. या पिसाळलेल्या मगरीवर अंकुश आणण्यासाठी वन्य विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले. तसेच या पिसाळलेल्या मगरीला सावरता सावरता त्यांना नाकीनौक आले.
या गरब्याच्या दरम्यान उपस्थिती लावली मगर ही पिपरीया येथील एका झऱ्याच्या येथून आली असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर गावातील लोकांनी यापूर्वीसुद्धा झऱ्याच्या ठिकाणी मगरीला पाहिले असल्याची पूर्वसूचना दिली वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली होती. मात्र वन अधिकाऱ्यांनी या प्रश्नाचे उत्तर असे दिले की, 'आम्ही मगरीला पकडण्यासाठी एक पिंजरा लावला होता, परंतु त्यात ती फसली नाही' असं म्हणत या गोष्टीचे स्पष्टीकरण दिले आहे.