MLA Veer Singh Bhuriya Beat Supervisor (PC - Twitter)

Congress MLA Veer Singh Bhuriya Beat Supervisor: मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील थांदला विधानसभेतील काँग्रेस आमदार वीर सिंह भुरिया (Veer Singh Bhuriya) यांनी मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नळ जल योजनेअंतर्गत बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाकीची पाहणी करण्यासाठी आमदार कचलदरा ​​येथे पोहोचले. यादरम्यान निकृष्ट काम पाहून त्याची नाराजी सुपरवायझरवर एवढी निघाली की, त्यांनी त्याला चप्पलने मारहाण केली. मात्र, याबाबत ठेकेदार काहीही बोलण्याचे टाळत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ एका व्यक्तीने लांब अंतरावरून घेतला आहे. व्हिडिओमध्ये पाण्याच्या टाकीजवळ जेसीबी फिरताना दिसत आहे. तर काही लोक तिथे उभे असलेले दिसतात. थांदलाचे आमदार वीर सिंह भुरिया तिथे उभ्या असलेल्या दुसऱ्या व्यक्तीला चपलाने मारहाण करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. तिथे उभा असलेला आणखी एक व्यक्ती त्यांना थांबवताना दिसत आहे. पण आमदार थांबण्याचे नाव घेत नाहीत. (हेही वाचा - Hardik Patel Join BJP: पंतप्रधान नरेंद्र मोदींचा 'छोटा सिपाही' म्हणत हार्दिक पटेल यांचा भाजपमध्ये प्रवेश)

घडलेल्या सर्व प्रकारावर बोलताना वीर सिंह म्हणाले की, 'नल जल योजनेअंतर्गत सुरू असलेल्या कामात कोट्यवधी रुपयांचा गैरवापर होत आहे. आदिवासी भागातील रस्ते खोदल्यानंतर कंत्राटदाराने त्यांना जसेच्या तसे सोडले आहे. पाण्याची एकही टाकी अद्याप सुरू झालेली नाही. याप्रकरणी चौकशीसाठी तयार असल्याचेही आमदारांनी सांगितले. त्यांच्याकडे ठेकेदाराच्या मनमर्जीचे व्हिडिओही आहेत, असंही सिंह यांनी सांगितलं.