भारतीय जनता पक्षाचा (BJP) मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कमलनाथ सरकार (Kamal Nath govt.) पाडण्याचा डाव आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला होता. तसेच भाजपने सत्ताधारी पक्षाच्या आठ आमदारांना एका हॉटेलमध्ये कोंडल्याचा दावा केला जात असून त्यांना 25 ते 35 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचाही सांगितले जात होते. यातच काँग्रेसचे जेष्ठ नेते दिग्विजय सिंह (Digvijaya Singh) यांनी भाजपचे ऑपरेशन लोटस फेल झाल्याचे माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. सर्व आमदारांची सुटका करण्यात आली असून कमलनाथ सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि माजी मंत्री नरोत्तम मिश्रा यांच्यासह भाजप नेते ‘ऑपरेशन लोटस’मध्ये गुंतल्याचा दावा आदल्याच दिवशी दिग्विजय सिंह यांनी केला होता. यात काँग्रेस पक्षाचे 4 तर, मित्रपक्षांचे 4 आमदारांना गुरुग्राममधील एका मोठ्या हॉटेलमध्ये बळजबरीने डांबून ठेवण्यात आले होते. तसेच मध्य प्रदेशात काल रात्री उशिरा या घडामोडी घडल्याचा दावा सत्ताधारी काँग्रेसने केला होता.
काँग्रेसचे अर्थमंत्री तरूण भनोट म्हणाले की, आयटीसीमध्ये आमचे 8 आमदारांना एका हॉटेलमध्ये कोंडल्याचा जबरदस्ती डांबून ठेवण्यात आले. तसेच त्यांना बाहेर येऊ देत नसल्याचे त्यावेळी त्यांनी सांगितले होते. दरम्यान, काँग्रेसचे मंत्री जयवर्धन सिंह आणि जीतू पटवारी यांनी हॉटेलमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पंरतु, दोन्ही मंत्र्यांचा हॉटेलमध्ये प्रवेश नाकारला, असा आरोपही भानोट यांनी केला होता. हे देखील वाचा- Delhi Violence: 'दिल्ली हिंसाचारावेळी शाहरुखने रागाच्या भरात केला होता गोळीबार, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही'; दिल्ली पोलिसांची माहिती
एएनआयचे ट्वीट-
Congress leader Digvijaya Singh in Delhi on being asked if there was any danger to the Congress government in Madhya Pradesh: There is no danger. We all are united. pic.twitter.com/V3cdsJCWcB
— ANI (@ANI) March 4, 2020
228 सदस्यसंख्या असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसचे 114 आमदार आहेत. त्यांना दोन बसपा, एक सपा आणि चार अपक्षांसह 7 आमदारांचा पाठिंबा आहे. तर भाजपकडे 107 आमदारांचे बळ आहे. त्यामुळे आठ आमदारांना वळवल्यास भाजपला सत्ता खेचून आणणे शक्य झाले असते.