(Photo Credit - PTI)

CNG Price Hike: सर्वसामान्य जनतेला आता आणखी महागाईच्या झळा लागणार आहेत. कारण, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडने सीएनजीच्या दरात (CNG Price) वाढ केली आहे. आता दिल्ली-एनसीआर (Delhi-NCR) मध्ये सीएनजीच्या दरात प्रति किलो एक रुपयाने वाढ करण्यात आली आहे. दिल्लीत सीएनजी 74.04 रुपये प्रति किलो दराने विकला जात होता, तो आता 75.09 रुपये प्रति किलो झाला आहे. नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबादमध्ये सीएनजीची किंमत 78.70 रुपये प्रति किलो असताना, आता तुम्हाला एक किलो सीएनजीसाठी 79.70 रुपये मोजावे लागतील. हे दर आजपासून लागू झाले आहेत.

गुरुग्राममध्ये सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. मात्र रेवाडीत सीएनजी एक रुपयाने महागणार आहे. रेवाडीमध्ये सीएनजी 78.70 ₹ प्रति किलो वरून 79.70 ₹ प्रति किलोपर्यंत वाढेल. याशिवाय कर्नाल आणि कैथलमध्ये सीएनजीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. तर मेरठ, मुझफ्फरनगर आणि शामलीमध्ये सीएनजी 79.08 ₹ प्रति किलोवरून 80.08 ₹ प्रति किलोपर्यंत वाढेल. (हेही वाचा -Robot Tax: पीएम मोदी सरकार 3.0 च्या पहिल्या बजेटसाठी तज्ज्ञांचा अर्थमंत्र्यांना 'रोबोट टॅक्स'चा प्रस्ताव, जाणून घ्या काय आहे संकल्पना)

उत्तर प्रदेशमध्ये बकरीदच्या आधी लोकांना महागाईचा आणखी एक धक्का सहन करावा लागला होता. या काळात लखनौ, उन्नाव, आग्रा आणि अयोध्येत सीएनजीच्या किमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.  (हेही वाचा: Child Food Poverty: जगातील प्रत्येक चौथ्या मुलाला मिळत नाही पोषक आहार; बाल अन्न गरिबीबाबत भारताची स्थिती अत्यंत गंभीर, UNICEF च्या अहवालात खुलासा)

गेल्या रविवारी सकाळी 6 वाजल्यापासून लखनौ, उन्नाव, आग्रा आणि अयोध्यामध्ये सीएनजीची नवीन किंमत 94.00 रुपये प्रति किलो झाली आहे. याआधी लखनौ, आग्रा, उन्नावमध्ये सीएनजीची किंमत 92.25/KG आणि अयोध्येत 92.35/KG होती.