Indore Shelter Home Tragedy: युगपुरुष धाम स्वयंसेवी संस्थेच्या बाल आश्रमातील मुलांना कॉलराची लागण, रुग्णालयात उपचार सुरु
हॉस्पिटल । Representational Image (Photo Credit: PTI)

Indore Shelter Home Tragedy: युगपुरुष धाम स्वयंसेवी संस्थेच्या बाल आश्रमातील मुलांना कॉलराची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. हा आजार दूषित पाणी पिल्यामुळे झाले असल्याचे सांगत आहे. आतापर्यंत, ८५ मुलांना लागण झाली. त्यांमुळे त्यांना रुग्णालयात उपाचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर बाल आश्रमामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. (हेही वाचा- मानवतेला काळीमा फासणारी घटना! झाशीतील पोस्ट मॉर्टम हाऊसमध्ये बाहेर ठेवण्यात आलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला; पहा धक्कादायक व्हिडिओ)

मिळालेल्या माहितीनुसार, कॉलराची लागण झाल्यानंतर मुलांवर उपचार सुरु झाले त्यासोबत आश्रममधील पिण्याच्या पाण्याची चाचणी देखील करण्यात आली. चाचणीत आश्रमाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याचे रिपोर्टमध्ये आले आहे. या प्रकरणानंतर आश्रमचालकांवर अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही. उपचार करून आता पर्यंत ३९ मुलांना बाल आश्रममध्ये परत पाठवण्यात आले आहे. धक्कादायक म्हणजे, दूषित पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि अन्न तयार करण्याठी केला जात होता हे स्पष्ट झाले आहे.

बाल विकास विभाग दखल घेणार

आश्रमातील आजारपणाची आणि बालमृत्यूची नोंंदणी प्रशासकिय अधिकाऱ्यांकडे नोंदवली गेली नाहीत. आरोग्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राजेंद्र शुक्ला यांनी सांगितले की, निष्काजीपणा आढळल्यास जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. या प्रकरणी पीएमो आणि बाल विकास विभागाने दखल घेणार आहे.  गुरुवारी १२ जणांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे त्यांना चाचा नेहरू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.