Mughal Garden (PC - Wikimedia Commons)

Mughal Garden Name Change: राष्ट्रपती भवनातील मुघल गार्डन (Rashtrapati Bhawan Mughal Garden) चे आता अमृत उद्यान (Amrit Udyan) असे नामकरण करण्यात आले आहे. अमृत ​​महोत्सवांतर्गत उद्यानाचे नामकरण करण्यात आले आहे. अमृत ​​उद्यान येथे ट्यूलिप (Tulip) च्या 12 जाती आहेत. आता हे उद्यान दरवर्षीप्रमाणे सामान्यांसाठीही खुले होणार असून, येथे लोकांना ट्यूलिप आणि गुलाबांची फुले पाहता येणार आहेत.

दरवर्षी अमृत उद्यान सर्वसामान्यांसाठी खुले केले जाते, जे आता 31 जानेवारीला खुले होणार असून ते 26 मार्चपर्यंत दोन महिने खुले राहणार आहे. उद्यान उघडण्याची वेळ सकाळी 10 ते दुपारी 4 अशी असेल. 28 मार्चला शेतकऱ्यांसाठी, 29 मार्चला दिव्यांगांसाठी आणि 30 मार्चला पोलिस आणि लष्करासाठी खुले होणार आहे. (हेही वाचा - भारतात पुन्हा एकदा चित्त्यांचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिकेत सामंजस्य करार)

सकाळी 10 ते दुपारी 12 वाजेपर्यंत 7500 लोकांसाठी तिकीट उपलब्ध असेल. त्यानंतर 12 ते 4 या वेळेत 10 हजार लोकांना प्रवेश मिळणार आहे. बागेत विशेष प्रकारची 12 ट्युलिप फुलांची लागवड करण्यात आली आहे.

तथापी, बागेत सेल्फी पॉइंटही आहेत, तसेच येथे फूड कोर्टही सुरू होणार आहे. क्यूआर कोडवरून लोकांना वनस्पतींच्या विविध प्रकारांची माहिती मिळू शकेल. तसेच या बागेत 120 प्रकारचे गुलाब आणि 40 सुगंधी गुलाब आहेत.