Jammu and Kashmir Accident: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये बस अपघात; वैष्णोदेवीला जाणाऱ्या 21 भाविकांचा मृत्यू, 18 जखमी
Jammu and Kashmir Accident (PC - PTI)

Jammu and Kashmir Accident: जम्मू-काश्मीरमधील अखनूर (Akhnoor) मध्ये हातरस (Hatras) येथील बस खड्ड्यात उलटली. या भीषण अपघातामुळे (Accident) बसमध्ये प्रवास करणाऱ्या 21 जणांचा मृत्यू झाला. हातरसच्या जिल्हा अधिकारी अर्चना वर्मा यांनी याबाबत हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी ते या हेल्पलाइन्स 05722227041, 05722227042 वर संपर्क साधू शकतात. ही बस वैष्णोदेवीकडे जात असताना वाटेत एका खड्ड्यात पलटी झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बसमध्ये प्रवास करणारे अनेक जण जखमी झाल्याचेही वृत्त आहे. बसचा क्रमांक Up 86 EC 4078 असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही बस भाविकांना घेऊन अखनूर चौकी चौरा काली धार पंच रोडवरून कुरुक्षेत्रमार्गे शिव खोडीला जात होती. चौकी चौरा तुगी वळणावर बसचा अपघात होऊन ती टेकडीवरून खाली कोसळली. (हेही वाचा - Indian Army Clash With J&K Police: श्रीनगरमध्ये लष्कर सैनिकांचा पोलिसांवर हल्ला करत अपहरण; व्हिडिओ समोर आल्यानंतर 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल)

पहा व्हिडिओ -

जवळून जाणाऱ्या वाहनांमधील प्रवाशांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. यात सुमारे 21 जण ठार झाले असून 40 जण जखमी झाल्याची माहिती आहे. प्राथमिक उपचारानंतर अनेकांना जम्मू जीएमसीमध्ये पाठवण्यात आले. काही जखमींवर चौकी चौरा हॉस्पिटल आणि अखनूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.