Aligarh Muslim University (फोटो सौजन्य - Wikimedia commons)

Aligarh Muslim University Bomb Threat: अलिगड मुस्लिम विद्यापीठात (Aligarh Muslim University, AMU) सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विद्यापीठाला बॉम्बची धमकी (Bomb Threat) मिळाल्यानंतर पोलिसांनी परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. विद्यापीठाच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना कॅम्पसमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देणारा ईमेल आला. पोलिस अधीक्षक (शहर) मृगांक शेखर पाठक यांनी सांगितले की, काल संध्याकाळपासून कॅम्पसमधील आणि आजूबाजूच्या सर्व संवेदनशील भागात तपासणी सुरू आहे. कुलगुरूंसह विद्यापीठाच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांना धमकीचा ईमेल मिळाला.

अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस आणि विद्यापीठाचे (अलीगड मुस्लिम विद्यापीठ) अधिकारी मौलाना आझाद ग्रंथालयासह सर्व गर्दीच्या ठिकाणी कडक नजर ठेवून आहेत. एएमयूचे प्रवक्ते असीम सिद्दीकी म्हणाले की, ईमेलमध्ये 'खंडणीच्या रकमेचा' देखील उल्लेख होता. विद्यापीठ अधिकाऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवली, ज्यांनी धमकी देणाऱ्या ईमेल आयडीचा स्रोत शोधण्यासाठी सायबर क्राइम सेललाही कळवले आहे. (हेही वाचा -Delhi School Bomb Threat: दिल्ली पोलिसांकडून डीपीएस आरके पुरम आणि इतर शाळांमध्ये तपासणी; ईमेलद्वारे मिळाली होती बॉम्बने उडवण्याची धमकी (Watch Video))

कॅम्पसमधील महत्त्वाच्या ठिकाणी श्वान पथके सक्रिय -

पोलिसांनी कॅम्पसमधील महत्त्वाच्या ठिकाणी श्वान पथके सक्रिय केली असून इतर सेवा देखील सुरू केल्या. पोलिस सर्कल ऑफिसर (सिव्हिल लाईन्स) अभय पांडे यांनी सांगितेल की, ही धमकी खोटी होती. शहराची शांतता बिघडवण्याच्या उद्देशाने ही धमकी देण्यात आली होती का? याचा तपास सुरू आहे. (हेही वाचा - Delhi School Bomb Threat: दिल्लीतील रोहिणीत परीक्षेला उशीर करण्यासाठी 2 विद्यार्थ्यांची शाळांना बॉम्बची धमकी; समुपदेशनाचे आदेश)

दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी -

दरम्यान, शुक्रवारी दिल्ली पोलिसांनी सांगितले की, त्यांनी राष्ट्रीय राजधानीतील शाळांमध्ये बॉम्बच्या धमक्या पाठवल्याच्या आरोपाखाली एका बारावीच्या विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे. गुरुवारी सुमारे एक डझन शैक्षणिक संस्थांना बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. दिल्लीतील शाळांना अशी धमकी मिळण्याची ही पहिलीचं वेळ नाही. अलिकडच्या काही महिन्यांत, उत्तर प्रदेशातील काही भागांमधील अनेक संस्था आणि विमानतळांनाही अशाच प्रकारच्या बॉम्बच्या धमक्या मिळाल्या होत्या. परंतु, या धमक्या खोट्या असल्याचे निष्पन्न झाले.