भोपाळच्या भाजप खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर (Pragya Singh Thakur) यांना व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉलवर अश्लील संदेश देण्यात आला. यानंतर खासदाराने टीटीनगर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
खासदार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना रविवारी संध्याकाळी 82807-74239 आणि 63716-08664 या मोबाईल क्रमांकावरून व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल्स आले होते. यामध्ये खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्लील व्हिडीओ दाखवून नंतर मेसेज करण्यात आला. जेव्हा त्यांनी यावर रिप्लाय दिला नाही तेव्हा, त्यांना अश्लील व्हिडिओमधून एक फोटो पाठवण्यात आला. ज्यामध्ये खासदार आणि तरुणीचे रेकॉर्डिंग होते. (वाचा -Rahul Gandhi Security Breach: जम्मू-काश्मीरमधील तरुणाने राहुल गांधींवर फेकला झेंडा, लुधियानात निर्माण झाली दहशत)
व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करणाऱ्याने साध्वी यांच्याकडे मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन टीटी नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी कलम 354, 507 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सोशल मीडियावर ब्लॅकमेलिंग -
विशेष म्हणजे सोशल मीडियावर व्हॉट्सअॅप कॉल करून मुलींचे व्हिडिओ क्लिपिंग करून लोकांना ब्लॅकमेल करणारी टोळी गेल्या अनेक दिवसांपासून सक्रिय आहे. छतरपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार नीरज दीक्षित यांच्यासोबतही असाच प्रकार घडला आहे. अनेक प्रकरणांमध्ये लोक तक्रार करत नाहीत आणि ते या टोळ्यांच्या जाळ्यात येतात. आता खासदाराला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश किती दिवसांत होतो हे पाहणं औसुक्याचे ठरणार आहे.