Bhajan Lal Sharma (Photo Credit - Facebook)

Rajasthan CM Oath Ceremony: राजस्थानचे मुख्यमंत्री (Rajasthan New CM) म्हणून निवड करण्यात आलेले भजनलाल शर्मा (Bhajan Lal Sharma) यांचा शपथविधी सोहळा आज जयपूर (Jaipur) येथे होणार आहे. शर्मा यांच्यासोबत दिया कुमारी (Diya Kumari) आणि प्रेमचंद बैरवा (Prem Chand Bairwa) हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. या तिघांना राज्यपाल कलराज मिश्रा यांच्या हस्ते पदाची शपथ देण्यात येणार आहे.

पंतप्रधान मोदी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार -

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भारतीय जनता पक्षाचे (भाजप) अध्यक्ष जे पी नड्डा, अनेक केंद्रीय मंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दुपारी 12 वाजता प्रतिष्ठित अल्बर्ट हॉलसमोरील शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. (हेही वाचा - Rajasthan New CM: भजनलाल शर्मा होणार राजस्थानचे नवे मुख्यमंत्री, वसुंधरा राजे यांचा पत्ता कट)

या शपथविधी सोहळ्याला लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरक्षा आणि बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पक्षाच्या प्रवक्त्याने सांगितले की, या सोहळ्यासाठी केंद्रीय नेते आणि राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रणे पाठवण्यात आली आहेत.

कार्यक्रमस्थळाकडे जाणारे सर्व मुख्य रस्ते केंद्र सरकारच्या विविध कल्याणकारी योजनांचे पोस्टर आणि बॅनर तसेच नेत्यांच्या कटआउट्सने सजवण्यात आले आहेत. दरम्यान, 25 नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 115 जागा मिळाल्या होत्या, तर काँग्रेसला 69 जागा मिळाल्या होत्या. राज्यात विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान झाले. (हेही वाचा - New Faces For CM Posts: भाजप चेहरा बदलण्याच्या तयारीत? तीन राज्यांमध्ये मुख्यमंत्री पदासाठी वेगवेगळ्या नावांची चर्चा)

तथापी, प्रथमच आमदार असलेले शर्मा यांची मंगळवारी पक्षाचे केंद्रीय निरीक्षक राजनाथ सिंह, सरोज पांडे आणि विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली. याशिवाय विद्याधर नगरच्या आमदार कुमारी आणि दुडू आमदार बैरवा यांची उपमुख्यमंत्र्यांसाठी तर अजमेर उत्तरचे आमदार वासुदेव देवनानी यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.