Andhra Pradesh Horror: विझियानगरम जिल्ह्यातील रामभद्रपुरम येथे दारूच्या नशेत एका 40 वर्षीय व्यक्तीने सहा महिन्यांच्या भाचीवर बलात्कार केला. चिमुकलीचे आई-वडिल घरी नसताना हा प्रकार घडला. रविवारी, 14 जुलै रोजी सकाळी बोयाना येरकन्ना डोरा या आरोपीला अटक करण्यात आली. घटनेवेळी चिमुकलीची आई दुकानातून काही सामान आणण्यासाठी बाहेर गेली होती. तेव्हा हा प्रकार घडला. आरोपीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (हेही वाचा: NDRF Team Deployed in Ratnagiri: रत्नागिरी जिल्ह्यात एनडीआरएफच्या दोन तुकड्या तैनात; नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी (Watch Video))
द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, ही भयानक घटना 13 जुलै रोजी शनिवारी सकाळी उघडकीस आली. जेव्हा चिमुकलीची आई तिच्या 10 वर्षांच्या मुलीला घरी पाळण्यामध्ये ठेऊन जवळच्या दुकानातून किराणा सामान आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी बाळाचा मामा, मद्यधुंद अवस्थेत घरात घुसला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. चिमुकलीला हिंसा सहण न झाल्यामुळे ती जोरजोरात रडू लागली. बाळाचे रडणे एकूण तिच्या बहिणीने घटनास्थळी धाव घेतली. तेव्हाच तिला बाळाच्या गुप्तांगातून रक्तस्त्राव होत असल्याचे समजले. ते रक्त मामाच्या हाताला देखील लागले होते.
समोरचे दृश्य पाहून धक्का बसलेल्या पीडितेच्या बहिणीने तिची आई आणि इतर गावकऱ्यांना याबाबत माहिती दिली. घटनेनंतर आरोपीने बाळाला परत तिच्या पाळणामध्ये ठेवून दिले आणि घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर, बाळाला त्वरीत बडंगी येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर विजिनगरम येथे हलविण्यात आले. जिथे वैद्यकीय तपासणीत तिच्यावर बलात्कार झाल्याचे उघड झाले.
डेक्कन क्रॉनिकलच्या अहवालानुसार, आईच्या तक्रारीनंतर, अधिकाऱ्यांनी त्वरीत कारवाई केली, लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायदा आणि कलम 65 (2) (जो कोणी एखाद्या महिलेवर बलात्कार करतो) च्या कडक तरतुदींखाली गुन्हा नोंदवला.