Uttar Pradesh: धक्कादायक! उत्तर प्रदेशमधील एटा जिल्ह्यात पाळीव कुत्र्यावरून शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात वृद्ध व्यक्तीवर गोळीबार
प्रातिनिधीक प्रतिमा (Gun-encounter)

Uttar Pradesh: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) एटा जिल्ह्यात (Etah District) पाळीव कुत्र्यावरून (Pet Dog) शेजाऱ्याशी झालेल्या भांडणात वृद्ध व्यक्तीवर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत वृद्ध व्यक्ती जखमी झाली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. यासंदर्भात पोलिसांनी माहिती दिली आहे.

राजेश मिश्रा, असं गोळीबार करण्यात आलेल्या वृद्ध व्यक्तीचं नाव आहे. या घटनेत राजेश मिश्रा गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आग्रा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, राजेश मिश्रा हे आपल्या कुत्र्याला फिरण्यासाठी बाहेर घेऊन गेले होते. यावेळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या दीपक मिश्रा यांनी काळ्या रंगाचा पाळीव प्राणी घाणेरडी दिसतो, असं म्हटलं. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडणाला सुरुवात झाली. त्यानंतर दीपकने बंदूक घेऊन राजेश यांच्यावर गोळी झाडली. (हेही वाचा - Navy's First Women Combat Aviators: सब लेफ्टनंट कुमुदिनी त्यागी आणि रिती सिंग या 2 महिला अधिकाऱ्यांची इतिहासामध्ये पहिल्यांदाचं नौदलाच्या हेलिकॉप्टर तुकडीमध्ये Observers म्हणून नियुक्ती)

दरम्यान, सहायक पोलिस अधीक्षक ओपी सिंह यांनी सांगितले की, राजेश मिश्रा आणि दीपक मिश्रा या दोघांनी एकमेकांवर गोळीबार केला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून त्याचा तपास करण्यासाठी पोलिसांचे दोन पथके तयार करण्यात आली आहेत. राजेश यांच्या कुटुंबीयांनी आरोपी म्हणून चार जणांची नावे दाखल केली आहेत.