नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि भाजप (BJP) पक्षाने जनतेला दिलेल्या आश्वासनांवर ही लोकसभा निवडणूक जिंकली. जनतेच्या अनेक मुलभूत गरजा पूर्ण करण्याची वचणे भाजपने दिली होती. त्यातीलच एक म्हणजे पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमती. मात्र आता निवडणुकींच्या निकालानंतर सलग 5 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दारामध्ये वाढ होताना दिसत आहे. गेल्या नऊ दिवसांत यामध्ये तब्बल 70-80 पैशांनी वाढ झालेली दिसत आहे. एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर 20 मेपासून पेट्रोलच्या दरामध्ये वाढ व्हायला सुरुवात झाली.
सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांच्या किमती अधिसूचनानुसार, नऊ दिवसांत पेट्रोलच्या किंमतीत 83 पैसे प्रति लिटर तर डिझेल 73 पैशांनी वाढले आहे. आज, मंगळवारी पेट्रोल 11 पैशांनी व डिझेल 5 पैशांनी वाढले. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये घट होण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. उलट येत्या काही दिवसांमध्ये या किंमतीमध्ये 3 रुपये प्रति लिटर अशी वाढ होऊ शकते. (हेही वाचा: पेट्रोल, डिझेल गुड बाय, आता आली सिंगल पॅसेंजर इलेक्ट्रिक कार, किंमत फक्त 11 लाख रुपये)
आजचे दर :
- दिल्ली –
पेट्रोल - प्रति लिटर 71.86
डिझेल – प्रति लिटर 66.69
- मुंबई –
पेट्रोल - प्रति लिटर 77.47
डिझेल – प्रति लिटर 69.88
- चेन्नई -
पेट्रोल - प्रति लिटर 74.59
डिझेल - प्रति लिटर 70.50
- कोलकाता -
पेट्रोल - प्रति लिटर 73.92
डिझेल - प्रति लिटर 68.45
आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ही इंधनाची किंमत वाढ झाली आहे. देशात लोकसभा निवडणुका चालू असल्याने तेल कंपन्यांनी आपल्या किंमती स्थिर ठेवल्या होत्या. मात्र आता झालेले नुकसान भरून काढण्यासाठी दरांमध्ये वाढ केली जात आहे.