फोटो सौजन्य- ANI

उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यातील एका महिला वकिलाने बुधवारी दारुच्या नशेत रस्त्यावरील गाड्यांना धडक मारली आहे. तसेच या महिलेला पोलिसांनी पकडले असता तिने पोलिसांवरच दादागिरी करण्यास सुरुवात केली.

दिप्ती चौधरी असे या महिला वकिलाचे नाव आहे. बुधवारी रात्री दारुच्या नशेत आपल्या मित्रासह गाडीतून जात होती. त्यावेळी दिप्तीने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुकाची आणि काही गाड्यांना जोरात धडक दिली आहे. त्याचवेळी रस्यावर या महिलेने आरडाओरड चालू करण्यास सुरुवात केली. तेथील स्थानिक लोकांनी या घटनेची पोलिसांत तक्रार केली. त्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून दिप्ती हिला अटक केली आहे.

मात्र पोलिसांनी दिप्तीची या घटनेप्रकरणी चौकशी केल्यास तिने बीजेपीचे व्यापार संघ नेता आणि निरज मित्तल यांनी माझ्या गाडीला धडक दिली असल्याचे सांगितले. तसेच ही लोक मला जीवेमारुन टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे ही आरोपी दिप्ती हिने पोलिसांना सांगितले आहे.