Close
Advertisement
 
शुक्रवार, डिसेंबर 27, 2024
ताज्या बातम्या
7 hours ago

Maharashtra: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाला अटक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ३६ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या 29 वर्षीय महिलेने पनवेल पोलिस ठाण्यात मोसीन हनिफ मुजावर नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती.

राष्ट्रीय Shreya Varke | Jun 11, 2024 12:45 PM IST
A+
A-
Hostage and rape | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

Maharashtra: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नवी मुंबई पोलिसांनी ३६ वर्षीय नराधमाला अटक केली आहे. एका अधिकाऱ्याने मंगळवारी ही माहिती दिली. या 29 वर्षीय महिलेने पनवेल पोलिस ठाण्यात मोसीन हनिफ मुजावर नावाच्या व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली होती. लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करणाऱ्या आरोपीसोबत तिचे प्रेमसंबंध असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, सोमवारी भारतीय दंड संहितेच्या (आयपीसी) कलम ३७६ (बलात्कार) आणि ३७६ (२) (एन) (महिलेवर वारंवार बलात्कार) गुन्हा दाखल करण्यात आला आणि रात्री उशिरा आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.


Show Full Article Share Now