Minor Blast Near Israel Embassy in Delhi: दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ आयडी स्फोट; कोणतीही जीवितहानी नाही
Minor Blast Near Israel Embassy in Delhi (Photo Credits-ANI Twitter)

Minor Blast Near Israel Embassy in Delhi: राजधानी दिल्लीत एकीकडे शेतकर्‍यांच्या कृषी विधेयकाविरोधात आंदोलन सुरू आहे. तसेच दुसरीकडे विजय चौकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थिती बीटिंग रिट्रीट सोहळा सुरू आहे. दरम्यान, दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ (Minor Blast Near Israel Embassy in Delhi) आयडी स्फोट झाला आहे. सुदैवाने या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दिल्लीत एपीजे अब्दुल कलाम रोडवर इस्राईली दूतावास आहे.

बॉम्बस्फोटाच्या बातमीने दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ खळबळ उडाली आहे. या स्फोटात अनेक गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. इस्त्रायली दूतावासाजवळ उभ्या असलेल्या गाड्यांच्या काचा फुटल्या आहेत. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्फोटाच्या माहितीनंतर अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. (वाचा - Union Budget Session 2021: कृषी कायदे, लाल किल्ला हिंसाचार प्रकरण ते कोविड 19 संकट पहा अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी अभिभाषणात काय म्हणाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद!)

स्फोटाची बातमी मिळताच दिल्ली पोलिस विशेष पथकासह घटनास्थळी पोहोचले. दिल्ली पोलिसांनी या स्फोटाची पुष्टी केली आहे. पोलिसांनी सांगितले की, फुटपाथजवळ स्फोट झाला. यात कारच्या काचा फुटल्या.