Accident In West Bengal: सोमवारी दार्जिलिंग (Darjeeling) मधील बागडोगरा (Bagdogra) येथे एशियन हायवे 2 (Asian Highway) वर भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले. जंगली बाबा मंदिरात धार्मिक विधीसाठी जात असलेले यात्रेकरूंना भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने धडक दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोषपुकुरहून सिक्कीमला जात असलेले वाहन यात्रेकरूंना धडकण्यापूर्वी रस्ता दुभाजकावरून कोसळले. यामुळे प्रल्हाद रॉय, गोविंद सिंग (22), अमलेश चौधरी (20), कनक बर्मन (22), प्रणव रॉय (28) आणि पदकांत रॉय यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Solapur Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Accident: संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रिंगण सोहळ्यात अपघात, पश्चिम बंगाल येथील फोटोग्राफरचा मृत्यू)
पहा व्हिडिओ -
Siliguri, West Bengal: A group returning from Baba Dham lost control and was hit by a car, causing 6 deaths and many injuries. The accident occurred near Bagdogra on National Highway 31. Emergency services responded, and the injured were taken to North Bengal Medical College… pic.twitter.com/8fxHWztdzJ
— IANS (@ians_india) August 12, 2024
प्राप्त माहितीनुसार, दोन जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. वाहनाचे नियंत्रण सुटण्याचे नेमके कारण शोधण्यासाठी अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. दरम्यान, रविवारी पंजाबमध्ये भीषण अपघात झाला, ज्यामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला. इनोव्हा कार पाण्यात वाहुन गेल्याने एकाच कुटुंबातील 8 जणांना जीव गमवावा लागला होता.