Ram Mandir वर टिप्पणी करणं मणिशंकर अय्यर यांच्या मुलीला पडलं महागात; Suranya Aiyar विरोधात दाखल करण्यात आली तक्रार
Suranya Aiyar (PC - X/@kashipathiravi)

Ram Mandir: काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर (Mani Shankar Aiyar) यांची मुलगी सुरन्या (Suranya Aiyar) विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सुरन्या अय्यरने राममंदिराच्या अभिषेक विरोधात 3 दिवस उपोषण केले होते. तिने हे देशातील मुस्लिम नागरिकांसाठी करत असल्याचे सांगितले होते. सोशल मीडियावरही त्यांनी एक वादग्रस्त पोस्ट केली होती. आता ती राहत असलेल्या सोसायटीच्या आरडब्ल्यूएने तिला माफी मागण्यासाठी नोटीस बजावली आहे. तिच्याविरोधात दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम ब्रँचमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे वकील आणि भाजप नेते अजय अग्रवाल यांनी शनिवारी ही तक्रार दाखल केली आहे. मणिशंकर अय्यर यांच्या मुलीने राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या 2 दिवस आधी 20 जानेवारी 2024 रोजी तिच्या इतर सोशल मीडिया हँडलशिवाय फेसबुक आणि यूट्यूबवर गंभीरपणे आक्षेपार्ह पोस्ट लिहिली, असं अग्रवाल यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्यांनी दिल्ली पोलिसांना 36 मिनिटांचा व्हिडिओ सुपूर्द केला आहे आणि तो आक्षेपार्ह असल्याचेही त्यांनी नमूद केलं आहे. (हेही वाचा - Ayodhya's Ram Temple Donations: अयोध्या राम मंदिरात 11 दिवसात तब्बल 11 कोटी रुपयांचे दान, प्राणप्रतिष्ठेनंतर 25 लाख भाविकांनी घेतले दर्शन)

तक्रारदार अजय अग्रवाल यांनी सुरन्या अय्यर विरुद्ध आयपीसी (भारतीय दंड संहिता) कलम 153A (विविध समुदायांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यापूर्वी, आरडब्ल्यूएने असेही म्हटले होते की, सुरन्या अय्यर कॉलनीचे नाव खराब करत आहे, तिने माफी मागावी किंवा इतर सोसायटीत जावे. (हेही वाचा: BAPS Hindu Mandir in Abu Dhabi New Pictures: बीएपीएस हिंदू मंदिराच्या प्रगतीचे साक्षीदार होण्यासाठी अबुधाबीमध्ये आंतरराष्ट्रीय मान्यवर एकत्र आले)

यापूर्वी, मणिशंकर अय्यर यांच्या मुलीने एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तिची आई त्यांना मध प्यायला देऊन उपवास सोडताना दिसत आहे. त्यामुळे समाजातील लोकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. काँग्रेस नेत्याच्या मुलीने माफी मागावी असे लोक म्हणत आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने मणिशंकर अय्यर यांची दुसरी मुलगी यामिनी हिच्याशी संबंधित 'सेंटर फॉर पॉलिसी रिसर्च' (CPR) चा FCRA परवाना बेकायदेशीर कामांमध्ये गुंतल्यामुळे रद्द केला होता.