7th Pay Commission: 7 व्या वेतन आयोगाचा महागाई भत्ता दसरा किंवा दिवाळी दरम्यान वाढण्याची शक्यता
Representational Image (Photo Credits: PTI)

केंद्र सरकार (Central government) 7 व्या वेतन आयोगाच्या (7th Pay Commission) अंतर्गत दसरा (Dasara) किंवा दिवाळीपर्यंत (Diwali) महागाई भत्ता किंवा डीएचे (DA) दर वाढवू शकते. यावर्षी जानेवारी महिन्यात डीए दरात पहिली दरवाढ जाहीर करण्यात आली. मात्र वेतनवाढ 1 जुलैपासून लागू झाली आहे. आता अहवाल सांगतो की 7 व्या वेतन आयोग किंवा 7 व्या सीपीसीनुसार (7 CPC) वेतन मिळालेल्या केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या डीए दरात आणखी वाढ होऊ शकते. केंद्र दसरा किंवा दिवाळीपर्यंत दर 3 टक्के वाढीची घोषणा होऊ शकते. सध्या 7 व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 28 टक्के डीए म्हणून मिळतात. जर 3 टक्के वाढ जाहीर केली गेली तर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ वेतनाच्या 31 टक्के डीए म्हणून मिळतील. साधारणपणे डीए दर वर्षातून दोनदा वाढवला जातो. या वर्षी जानेवारीमध्ये डीए दर 4 टक्क्यांनी वाढवण्यात आला.

डीए दरात आणखी 3 टक्क्यांची वाढ दसरा किंवा दिवाळी म्हणजेच ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये डीए दर वाढीची घोषणा होऊ शकते असे वृत्त आले आहे. मात्र केंद्राने या विषयावर मौन बाळगले आहे. अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाने (AICPI) जानेवारी ते मे दरम्यान जारी केलेल्या आकडेवारीचा हवाला देत नुकत्याच दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याची शक्यता जास्त आहे. हेही वाचा Supertech Emerald Court Case: सुप्रीम कोर्टाचा आदेश, तोडणार 40 मजल्यांचा टॉवर, पाहा काय आहे 'सुपरटेक एमेराल्ड' प्रकरण

एआयसीपीआयने मे 2021 साठी निर्देशांकात 0.5 अंकांच्या वाढीनंतर 120.6 ला पोहोचला. कामगार मंत्रालयाने अद्याप जूनची आकडेवारी जाहीर केलेली नाही.  जूनमध्ये एआयसीपीआय 130 ला पोहोचला तर डीएमध्ये 4 टक्के वाढ जाहीर केली जाऊ शकते. परंतु AICPI ला एका महिन्यात 10 गुणांची उडी मारणे अशक्य आहे. त्यामुळे DA मध्ये 3 टक्के वाढ होण्याची शक्यता जास्त आहे, असे अहवालात म्हटले आहे