Dibrugarh Express Derailed, Yogi Adityanath (PC - X/Facebook)

Dibrugarh Express Derailed: उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) गोंडा (Gonda) येथे गुरुवारी ट्रेन रुळावरून घसरल्याने चंदिगड-दिब्रूगड एक्स्प्रेसचे (Chandigarh-Dibrugarh Express) किमान 10 डबे उलटले. या घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 20 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी या घटनेची दखल घेत अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून बचाव आणि मदत कार्य सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

अपघातानंतर काही वेळातच घटनास्थळावरील दृश्य सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडिओमध्ये डबे पलटी होऊन रुळावरून घसरल्याचे दिसत आहे. या अपघातामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. सोशल मीडियावर फिरत असलेल्या व्हिडिओंमध्ये स्थानिक आणि ट्रेनमधील इतर प्रवासी जखमींना मदत करताना दिसत आहेत. (हेही वाचा -Dibrugarh Express Derailed: उत्तर प्रदेशातील गोंडा येथे रेल्वे अपघात; दिब्रुगड एक्सप्रेस रुळावरून घसरली, एकाचा मृत्यू (Watch Video))

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे ट्विट - 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत मोठ्या स्तरावर मदतकार्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर भारतीय रेल्वेने माहिती प्रसारित करण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. अनेक बचाव पथके अपघाताच्या ठिकाणी पोहोचली आहेत. (हेही वाचा - Mumbai Woman Loses Legs in Train Accident: लोकल पकडण्याच्या प्रयत्नात पुन्हा एक अपघात; महिला पाय घसरुन पडली अन् अंगावरुन ट्रेन गेली, दोन्ही पाय गमावले)

पहा व्हिडिओ -  

दरम्यान, बुधवारी रात्री 11.35 वाजता चंदीगड स्थानकातून सुटलेली ही ट्रेन आसाममधील दिब्रुगडकडे निघाली होती. उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील मोतीगंज-झिलाही रेल्वे स्थानकांदरम्यान हा अपघात झाला. रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी, 15 रुग्णवाहिका आणि 40 वैद्यकीय पथके घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यात कामरूप एक्स्प्रेसचे इंजिन आणि एक डबा वेगळा झाला होता.