Anti-Naxal Operation in Chhattisgarh's Kanker: छत्तीसगडमधील कांकेर येथे झालेल्या कारवाईत प्रमुख नक्षलवादी नेत्यासह 18 ठार
Anti-Naxal Operation in Chhattisgarh's प्रतिकात्मक प्रतिमा (PC - X/@Nikhil17529828)

Anti-Naxal Operation in Chhattisgarh's Kanker: छत्तीसगडमधील (Chhattisgarh) कांकेर (Kanker) जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल (BSF) आणि जिल्हा राखीव रक्षक (DRG) यांच्या संयुक्त कारवाईत मंगळवारी त्यांच्या एका प्रमुख नेत्यासह किमान 18 नक्षलवादी (Naxalite) ठार झाले. नक्षल नेते शंकर राव यांच्यावर 25 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

या चकमकीत तीन जवान जखमी झाले असून 18 नक्षलवादी ठार झाले आहेत. घटनास्थळावरून सात एके-47 रायफल आणि तीन लाईट मशीन गनसह शस्त्रांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (हेही वाचा -Boat Capsized in Jhelum River : झेलम नदीत बोट उलटल्याने 10 विद्यार्थ्यांसह अनेक जण नदीत बुडले; रेस्क्यू ऑपरेशन सुरू)

प्राप्त माहितीनुसार, विशिष्ट गुप्तचर माहितीवर कारवाई करत, BSF ने जिल्हा राखीव रक्षक (DRG) च्या संयोगाने कांकेरमधील छोटेबेटिया पोलिस स्टेशनच्या हद्दीतील बिनागुंडा भागात संयुक्त कारवाई सुरू केली. ऑपरेशन दरम्यान, बीएसएफ टीमला सीपीआय माओवादी बंडखोरांकडून जोरदार गोळीबार झाला. बीएसएफच्या जवानांनी हल्लेखोरांना तत्परतेने प्रत्युत्तर दिले.

दरम्यान, चकमकीच्या ठिकाणी 18 माओवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. बीएसएफने सांगितले की, ऑपरेशनच्या ठिकाणाहून सात एके सीरीज रायफल आणि तीन लाइट मशीन गन (एलएमजी) जप्त करण्यात आल्या आहेत. या गोळीबारात दोन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत.