Doctors Removed Tumor From Girl’s Neck: 17 वर्षांच्या मुलीला RIMS मधील डॉक्टरांनी दिले नवजीवन; तब्बल 9 तास ऑपरेशन करून काढली 3 किलोची गाठ
शस्त्रक्रिया प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Pixabay)

Doctors Removed Tumor From Girl’s Neck: RIMS मधील न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरी विभागाच्या डॉक्टरांनी तब्बल नऊ तासांच्या गुंतागुंतीची शस्त्रक्रिया (Operation) करून 17 वर्षांच्या मुलीच्या डोक्यातून सुमारे तीन किलो वजनाची गाठ (Tumor) काढून तिला नवजीवन दिले. चाईबासा येथील रहिवासी असलेल्या या मुलीच्या मानेच्या मागच्या बाजूला जन्मापासूनच मोठी गाठ होती, त्यामुळे डोके आणि मान हलवताना खूप त्रास होत होता. वैद्यकीय भाषेत याला Plexiform Neurofibromatosis असं म्हटलं जातं.

दरम्यान, कुटुंबीयांनी अनेक रुग्णालयात उपचारासाठी धाव घेतली. मात्र, शस्त्रक्रियेतील गुंतागुंत लक्षात घेऊन सर्वांनी उपचारास नकार दिला. शेवटी मुलीला RIMS च्या न्यूरोसर्जरी विभागातील प्रो. डॉ. सीबी सहाय यांच्या युनिटमध्ये दाखल करण्यात आले. न्यूरोसर्जरी आणि प्लास्टिक सर्जरीच्या टीमने अनेक तास चाललेल्या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत ट्यूमर काढला. ही गाठ खूप मोठी होती. तसेच ही गाठ काढताना रक्तस्राव होत असल्याने ऑपरेशन करताना टीमला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. (हेही वाचा -Mumbai: सायन रुग्णालयातील डॉक्टरांची 15 वर्षांच्या मुलावर यशस्वी शस्त्रक्रिया; मानेतून आणि खांद्यामधून काढली 2.5 किलोची गाठ)

दरम्यान, मुलीची प्रकृती आता चांगली असून लवकरच तिला डिस्चार्ज देण्यात येईल. डॉ. सहाय यांनी सांगितले की, ही एक अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती. त्यासाठी योग्य नियोजन करण्यात आले होते. अखेर नऊ तास चाललेल्या शस्त्रक्रियेला यश आले. (हेही वाचा - Neuroendocrine Tumor: इरफान खान यांच्या मृत्यूचे कारण ठरला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर! जाणून घ्या हा आजार कसा होतो, त्याचे लक्षण आणि उपचार)

तथापी, मुलीच्या कुटुंबियांनी सांगितले की, मुलीच्या मानेला गाठ असल्याने तिला कुठेही जाता येत नव्हते. मात्र, रिम्समध्ये आल्यानंतर एक आशा निर्माण झाली आणि डॉक्टरांच्या अथक परिश्रमानंतर शस्त्रक्रिया यशस्वी झाली. आता ती गाठ नाहीशी झाली आहे.