Bihar : एक्सप्रेसमध्ये सापडल्या 16 मानवी कवट्या आणि  34 सांगाडे, एका आरोपीला अटक
प्रतीकात्मक फोटो ( Photo Credit: Pixabay )

बिहारमधील छपरा रेल्वेस्थानकावर (Chhapra Railway Station) 16 मानवी कवट्या आणि 34 सांगाडे  सापडल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली आहे. तसेच या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपी संजय प्रसाद असे त्याचे नाव आहे.आरोपी हा बिहारमधील मधील दूधियावा गावचा आहे.  मंगळवारी बलिया- सियालदह या एक्सप्रेसमधून हा आरोपी प्रवास करत होता. परंतु बिहारमध्ये अवैध पद्धतीने विकली जाणारी दारु आणि अंमली पदार्थ यांच्या विरोधात अभियान राबविण्यात आले होते. त्यानुसार मंगळवारी रात्री या एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली असून आरोपीच्या बॅगमध्ये मानवी हाडांचे सांगाडे आणि कवट्या (Skeleton) सापडल्या आहेत.

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याने उत्तरप्रदेशातील बलीयामधून हे मानवी कवट्या आणि सांगाडे आणले असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपी या तस्करी केलेल्या वस्तू पश्चिम बंगालमार्गे भुतानला घेऊन जाणार होता अशी माहिती पोलीस उप-अधीक्षक मोहम्महद तनवीर आलम यांनी दिली आहे.