10 वर्षीय मुलीवर नातेवाईकाकडून बलात्कार, आरोपीला अटक
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: Latestly/Illustration)

दिल्लीमध्ये शकरपुरमध्ये 10 वर्षीय मुलीवर तिच्या नातेवाईकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घडना घडली आहे. तर आरोपीला  पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.

शकरपुरमध्ये एका मुलीवर बलात्कार केल्याची घटना रविवारी घडली आहे. या मुलीच्या काकाने ती घरी एकटी असल्याचा फायदा घेऊन तिच्यावर या नराधमाने बलात्कार केला आहे. त्यामुळे मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहे. मात्र या घटनेने या मुलीच्या घरच्यांना धक्काच बसला आहे.

या प्रकरणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पीडित मुलीच्या घरातल्यांनी या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे.