ठळक बातम्या
Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2'ची होणार शानदार ओपनिंग, 300 कोटींहून अधिक कमाई करून करणार विक्रम
Amol More'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्याच दिवशी हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबचा भाग बनेल.
India Beat Prime Ministers: सराव सामन्यात भारताचा विजय, शुभमन गिल चमकला तर हिटमॅन पुन्हा फ्लाॅप
Nitin Kurheपिंक बॉल कसोटीत आपली पकड मजबूत करण्यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध दोन दिवसीय सराव सामना खेळला. जिथे भारतीय संघाने मिनिस्टर इलेव्हनचा एकतर्फी पराभव केला. टीम इंडियाने हा सामना 6 विकेटने जिंकला.
Ujjain Gang Rape: धक्कादायक! उज्जैनमध्ये 3 तरुणांचा 16 वर्षीय मुलीवर चालत्या कारमध्ये सामूहिक बलात्कार, एकाला अटक; दोघांचा शोध सुरू
Bhakti Aghavएका तरुणाने अल्पवयीन मुलीला आमिष दाखवून कारमध्ये नेले आणि वाटेत आणखी दोन तरुण कारमध्ये बसले. यावेळी अल्पवयीन मुलीवर चालत्या कारमध्ये तोंड दाबून सामूहिक बलात्कार करण्यात आला. बलात्कारानंतर तरुणाने तरुणीला उज्जैन आग्रा रोडवरील मेडिकल कॉलेजच्या बाहेर सोडून घटनास्थळावरून पळ काढला.
Virat Kohli Stats In Pink Ball Test: पिंक बाॅल कसोटीत विराट कोहलीची कशी आहे कामगिरी? येथे वाचा 'रन मशीन'ची आकडेवारी
Nitin Kurheदोन्ही संघांमधील दुसरा सामना ॲडलेड ओव्हल येथे भारतीय वेळेनुसार सकाळी 9.30 वाजता होणार आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा 295 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. अशा परिस्थितीत टीम इंडियाचे मनोबल खूप वाढले आहे.
ZIM vs PAK 1st T20I 2024 Toss Update: झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघ
Amol Moreपहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
Bangladesh: बांगलादेशमध्ये आणखी 2 भिक्षूंना अटक; आदिपुरुष श्याम दास आणि रंगनाथ दास ब्रह्मचारी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
Jyoti Kadamकोलकाता इस्कॉनचे उपाध्यक्ष राधा रमण यांनी सांगितले की, चिन्मय कृष्ण दास यांची भेट घेऊन घरी जात असताना पोलिसांनी शुक्रवारी 2 भिक्षुंना अटक केली.
Avinash Jadhav Resigns: मनसे नेते अविनाश जाधव यांचा ठाणे, पालघर जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा
Dipali Nevarekarठाणे, पालघर येथील विधानसभा निवडणूकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारत जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं अविनाश जाधव यांनी म्हटलं आहे.
Kurla Tragedy: कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू
Bhakti Aghavमिलन नगरचा रहिवासी असलेला उज्ज्वल त्याच्या आई आणि आजीसोबत राहत होता. उज्ज्वलच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते.
Prime Ministers XI vs India: ऑस्ट्रेलियात पोहोचताच रोहित शर्मा ठरला अपयशी, 11 चेंडूत केवळ तीन धावा करून बाद
Nitin Kurheटीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पंतप्रधान इलेव्हन विरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात सलामीला आला नाही. रोहित शर्मा ओपनिंग करेल आणि मधल्या फळीत केएल राहुलला ओपनिंग करायला सांगेल असं वाटत होतं, पण रोहित शर्मानं आपली जबाबदारी चोख बजावली आणि केएल राहुलला यशस्वी जैस्वालसोबत ओपनिंगसाठी पाठवलं.
Asia Cup: हॉकी इंडियाने आशिया चषक स्पर्धेसाठी 20 सदस्यीय ज्युनियर महिला संघाची केली घोषणा
Amol Moreसाक्षी राणाला भारतीय संघाची उपकर्णधार बनवण्यात आली आहे. संघाकडे निधी आणि अदिती माहेश्वरीच्या रूपाने दोन गोलरक्षक आहेत, तर बचावाची जबाबदारी मनीषा, ज्योती सिंग, लालथंटलुंगी, पूजा साहू आणि ममता ओराम सांभाळतील.
Girl Buried Under Soil in Buxar: शाळा परिसरात मातीच्या ढिगाऱ्याखाली विद्यार्थीनी दबल्याची दुर्घटना; 4 जणींचा मृत्यू (Watch Video)
टीम लेटेस्टलीबक्सरमध्ये सारेंजा सरकारी शाळेजवळ मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडून चार मुलींचा मृत्यू झाल्याची एक दुःखद घटना घडली. एका मुलीला वाचवण्यात आले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Jay Shah ICC chairman: जय शाह यांनी आयसीसी अध्यक्षपदाचा स्वीकारला पदभार, चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन असणार मोठे आव्हान
Nitin Kurheगेल्या पाच वर्षांपासून बीसीसीआयचे (BCCI) सचिव असलेले 36 वर्षीय जय शाह, आयसीसीच्या संचालक मंडळाची एकमताने निवड झाली आणि न्यूझीलंडचे वकील ग्रेग बार्कले यांची जागा घेतली, ज्यांना सलग तिसऱ्यांदा या पदावर राहायचे नव्हते.
WI vs BAN 2nd Test 2024 Day 2 Live Streaming: पावसामुळे प्रभावित झालेल्या दुसऱ्या कसोटीत बांगलादेशचे मोठ्या धावसंख्येकडे लक्ष, येथे जाणून घ्या केव्हा, कुठे आणि कसे थेट प्रक्षेपण पाहू शकता
Amol Moreवेस्ट इंडीज क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना 30 नोव्हेंबरपासून (शनिवार) सबिना पार्क, किंग्स्टन, जमैका येथे खेळला जात आहे.
Margashirsha Guruvar Vrat 2024 Dates: 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मासारंभ; पहा यंदा गुरूवार व्रताच्या तारखा काय?
Dipali Nevarekarमार्गशीर्ष महिन्यात गुरूवारी महालक्ष्मीचं व्रत करणार्या महिला एक दिवसाचा उपवास करतात. या दिवशी घटाच्या रूपात महालक्ष्मीची पूजा केली जाते.
Share Market Holidays in December 2024: डिसेंबरमध्ये किती दिवस शेअर बाजार बंद राहणार? 'या' दिवशी NSE-BSE मध्ये होणार नाही ट्रेडिंग
Bhakti Aghavख्रिसमसच्या सुट्टीचाही समावेश केल्यास, डिसेंबर 2024 मध्ये एकूण 10 दिवस व्यापार बंद असणार आहे. याचा अर्थ डिसेंबरमध्ये 31 दिवसांत केवळ 21 ट्रेडिंग सत्रे शिल्लक आहेत.
Eknath Shinde at Janani Devi temple in Satara: तीन दिवसांच्या आजारपणानंतर एकनाथ शिंदे यांनी आज घेतलं सातारा मध्ये जनाई देवीचं दर्शन (Watch Video)
Dipali Nevarekarयेत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडणारा आहे. त्यासाठी आता शिंदे सातार्यातून मुंबईला येणार असल्याचा अंदाज आहे.
Flights Struggle to Land in Chennai: पायलटकडून लँडिंग चुकलं अन् विमान 2 वेळा रनवेवर आदळल; फेंगल चक्रीवादळामुळे विमानसेवा अडचणीत (Watch Video)
टीम लेटेस्टलीशनिवारी फेंगल चक्रीवादळ पुद्दुचेरीमध्ये दाखल झाल्यानंतर, रविवारी चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धुसर हवामान निर्माण झाले. क्रॉसवाइंड आणि खराब दृश्यमानतेमुळे विमानांना योग्य पद्धतीने उतरवण्यासाठी पायलट्सना मोठा संघर्ष करावा लागला.
Eknath Shinde Health Update: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती स्थिर; दरेगावातून आज मुंबईला परतणार
Bhakti Aghavउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज एकनाथ शिंदे यांना फोन करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. शिंदे हे गेल्या तीन दिवसांपासून सातारा जिल्ह्यातील त्यांच्या गावी आहेत. शिंदे रविवारी संध्याकाळी मुंबईत परतण्याची शक्यता आहे.
Cyclone Fengal: फैंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरीमध्ये 30 वर्षांतील सर्वाधिक पावसाची नोंद; चेन्नईमध्ये लोकल ट्रेन सेवा सुरू
टीम लेटेस्टलीपुद्दुचेरीमध्ये 50 सेमी पाऊस झाला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना वाचवण्यासाठी बचाव पथके प्रयत्न करत आहे.
Fans Chants Mumbai Cha Raja At Manuka Oval: मुंबईचा राजा रोहित शर्मा, मनुका ओव्हल स्टेडियममध्ये हिटमॅनच्या नावाचा जयघोष (Watch Video)
टीम लेटेस्टलीसराव सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशीचा खेळ 46 षटकांचा करण्यात आला. पाहुण्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ मैदानात येताच चाहत्यांनी 'रोहित-रोहित' आणि 'मुंबईचा राजा, रोहित शर्मा'च्या घोषणा दिल्या.