Pushpa 2 Box Office Collection: 'पुष्पा 2'ची होणार शानदार ओपनिंग, 300 कोटींहून अधिक कमाई करून करणार विक्रम

'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्याच दिवशी हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबचा भाग बनेल.

Photo Credits - Youtube

Pushpa 2 The Rule Box Office Collection:  अल्लू अर्जुनच्या आगामी 'पुष्पा 2: द रुल' या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. आता चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. 'पुष्पा 2: द रुल' रिलीज झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर राज्य करेल असे बोलले जात आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग करून हा चित्रपट अनेक विक्रम मोडणार आहे.

'पुष्पा 2: द रुल' 5 डिसेंबरला चित्रपटगृहात दाखल होणार आहे. पडद्यावर प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाचे ॲडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. SACNILC च्या अहवालानुसार, पहिल्याच दिवशी हा चित्रपट 300 कोटींच्या क्लबचा भाग बनेल. हा चित्रपट देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 200 कोटींचा टप्पा पार करेल. (हेही वाचा -  Raj Kundra Summoned By ED: पॉर्नोग्राफी प्रकरणी राज कुंद्रा यांना ईडीचे समन्स; चौकशीसाठी उद्या हजर राहण्याचे आदेश)

अहवालात दावा करण्यात आला आहे की 'पुष्पा 2: द रुल' भारतात पहिल्या दिवशी 233 कोटी रुपयांच्या कलेक्शनसह आपले खाते उघडू शकते. आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये चित्रपट पहिल्या दिवशी 105 कोटींची कमाई करू शकतो. हा चित्रपट कर्नाटकात 20 कोटी रुपये, तामिळनाडूमध्ये 15 कोटी रुपये आणि केरळमध्ये 8 कोटी रुपये कमवू शकतो. इतर राज्यांमधून, 'पुष्पा 2: द रुल' सुमारे 85 कोटी रुपयांचा व्यवसाय करू शकतो.

'पुष्पा 2: द रुल' 300 कोटींहून अधिक कमाई करून विक्रम करणार!

'पुष्पा 2: द रुल' केवळ भारतातच नाही तर जगभरात इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. अल्लू अर्जुन स्टारर चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्ये यूएसएमध्ये रेकॉर्डब्रेक कलेक्शन केले आहे. परदेशी बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट 70 कोटींची कमाई करू शकतो, असे बोलले जात आहे. एकूणच, 'पुष्पा 2: द रुल' जगभरात 303 कोटी रुपयांमध्ये ओपन करू शकतो. असे झाल्यास 'पुष्पा 2: द रुल' पहिल्याच दिवशी 300 कोटींचा टप्पा ओलांडणाऱ्या पहिल्या भारतीय चित्रपटाचे नाव घेईल.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now