Eknath Shinde at Janani Devi temple in Satara: तीन दिवसांच्या आजारपणानंतर एकनाथ शिंदे यांनी आज घेतलं सातारा मध्ये जनाई देवीचं दर्शन (Watch Video)
येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडणारा आहे. त्यासाठी आता शिंदे सातार्यातून मुंबईला येणार असल्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागील 3 दिवसांपासून ताप, सर्दी, थ्रोट इंफेक्शनचा त्रास होत होता. मात्र आज शिंदे घराबाहेर पडून सातारा मध्ये जनाई देवीच्या दर्शनाला पोहचले आहे. मागील 3 दिवस आजारपणामुळे ते कुणालाच भेटले नव्हते. मंत्री दीपक केसरकरांसह सामान्य कार्यकर्त्यांना माघारी फिरावं लागलं होतं. पण आता जनाई देवीचं दर्शन घेऊन मुख्यमंत्र्यांचा ताफा सातार्यातून मुंबईला माघारी येण्याची शक्यता आहे. येत्या 5 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी आझाद मैदानावर पार पडेल.
एकनाथ शिंदे सातार्यात देवीच्या दर्शनाला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)