Kurla Tragedy: कुर्ल्यातील एसटी डेपोमध्ये बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मिलन नगरचा रहिवासी असलेला उज्ज्वल त्याच्या आई आणि आजीसोबत राहत होता. उज्ज्वलच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते.

Death प्रतिकात्मक फोटो Photo Credit- X

Kurla Tragedy: शनिवारी कुर्ल्यातील (Kurla) नेहरू नगर स्टेट ट्रान्सपोर्ट (एसटी) डेपो (ST Depot) मध्ये पाणी साचलेल्या खड्ड्यात पडून सात वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. उज्ज्वल रवी सिंग असं या मुलाचं नाव आहे. मिलन नगर (Milan Nagar) चा रहिवासी असलेला उज्ज्वल त्याच्या आई आणि आजीसोबत राहत होता. उज्ज्वलच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले होते. त्यांच्या निधनानंतर त्याचे कुटुंब आर्थिकदृष्ट्या संघर्ष करत होते.

स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, मिलन नगरमधील मुलांचा एक गट डेपोच्या आवारात घुसला, ज्यात अनधिकृत प्रवेश रोखण्यासाठी कोणतीही सुरक्षा नव्हती. खेळत असताना उज्वल चुकून खोदकामानंतर पडलेल्या पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडला. यानंतर त्याचे मित्र घाबरून तेथून पळून गेले. (हेही वाचा -Boy Dies after Fall in Manhole: खेळताना 4 वर्षीय चिमुकल्याचा Manhole मध्ये पडून मृत्यू, थरारक घटना CCTV कॅमेऱ्यात कैद (Watch Video))

दरम्यान, स्थानिक रहिवाशांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) आणि कंत्राटदारांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला असून दावा केला आहे की, धोकादायक खड्ड्यात कोणतीही चेतावणी चिन्हे किंवा अडथळे नाहीत. या घटनेसाठी जबाबदार अधिकाऱ्यांना जबाबदार धरले पाहिजे, असे एका रहिवाशाने म्हटले आहे. (हेही वाचा -Kid Dies While Making Reel with Noose: रील बनवताना 11 वर्षांच्या मुलाचा फास लागून मृत्यू; मध्य प्रदेशातील मुरैना येथील घटना (Watch Video))

उज्ज्वलला उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच नेहरू नगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून नेहरू नगर पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. तसेच पुढील तपास सुरू केला आहे. झोन VI चे DCP नवनाथ ढवळे यांनी सांगितले की, आम्ही MSRTC कडून माहिती गोळा करत आहोत आणि निष्काळजीपणाची पुष्टी झाल्यास आवश्यक कारवाई करू.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now