ZIM vs PAK 1st T20I 2024 Toss Update: झिम्बाब्वे विरुद्ध सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून घेतला फलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघ

पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

ज़िम्बाब्वें वि. पाकिस्तान (Photo: @ZimCricketv/@TheRealPCB)

Zimbabwe National Cricket Team vs Pakistan National Cricket Team 1st T20I Match 2024: झिम्बाब्वे राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना उद्या म्हणजेच 1 डिसेंबर रोजी होणार आहे. बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लब येथे भारतीय वेळेनुसार 5 वाजल्यापासून दोन्ही संघांमधील सामना खेळला जाईल. हा सामना दोन्ही संघांसाठी नव्या सुरुवातीची संधी असेल. टीम इंडियाविरुद्ध टी-20 मालिका गमावल्यानंतर झिम्बाब्वे संघाला पुनरागमन करायचे आहे, तर पाकिस्तानही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 3-0 अशा पराभवानंतर पुन्हा गती मिळवण्याचा प्रयत्न करेल. पहिल्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.  (हेही वाचा  -  ZIM vs PAK 1st T20I Match 2024 Pitch Report And Weather Update: झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात रविवारी होणार रोमांचक सामना, जाणून घ्या सामन्यापूर्वी खेळपट्टीचा अहवाल आणि हवामान परिस्थिती)

पाहा पोस्ट -

झिम्बाब्वे आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 18 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या काळात पाकिस्तान संघाचे पारडे जड झाले आहे. पाकिस्तान संघाने 16 सामने जिंकले आहेत. तर झिम्बाब्वेला केवळ दोनच सामने जिंकता आले आहेत.

पाहा दोन्ही संघ:

पाकिस्तान (प्लेइंग इलेव्हन): सैम अयुब, तय्यब ताहीर, ओमेर युसूफ, उस्मान खान (विकेटकिपर), सलमान आगा (कर्णधार), इरफान खान, जहांदद खान, अब्बास आफ्रिदी, अबरार अहमद, हारिस रौफ, सुफियान मुकीम

झिम्बाब्वे (प्लेइंग इलेव्हन): तादिवानाशे मारुमनी (विकेटकिपर), ब्रायन बेनेट, डिओन मायर्स, सिकंदर रझा (कर्णधार), रायन बर्ल, क्लाइव्ह मदांडे, ताशिंगा मुसेकिवा, वेलिंग्टन मसाकादझा, रिचर्ड नगारावा, ब्लेसिंग मुझाराबानी, ट्रेव्हर ग्वांडू

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement