ठळक बातम्या

Viral Video: कोलांटी उडी मारतांना तरुणाच्या मानेला गंभीर दुखापत, 6 दिवसानंतर उपचारादरम्यान मृत्यू

Shreya Varke

गुलाटी मारण्याचा प्रयत्न मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यात एका तरुणासाठी जीवघेणा ठरला. या वेदनादायक घटनेत तरुणाच्या मानेचा लचका तुटला, त्यामुळे त्याला गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सहा दिवस जीवन-मरणाशी झुंज देत या तरुणाचा मृत्यू झाला. काही चटई आणि गाद्या गोळा केल्यानंतर तरुण गुलाटीला मारण्याचा प्रयत्न करत होता, असे सांगण्यात येत आहे.

ZIM vs AFG 3rd Match ODI 2024 Live Streaming: तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार चुरशीची लढत, येथे जाणून घ्या भारतात थेट सामन्याचा आनंद कधी अन् कुठे होणार

Nitin Kurhe

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तान संघाने झिम्बाब्वेचा 232 धावांनी पराभव केला. तर पहिला सामना पावसामुळे वाहून गेला. यासह अफगाणिस्तान संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेत झिम्बाब्वेची कमान क्रेग एर्विनच्या हाती आहे. तर अफगाणिस्तानचे नेतृत्व हशमतुल्ला शाहिदी करत आहे.

Couple’s Dispute Over Baby Name : मुलाच्या नावाचा वाद घटस्फोटापर्यंत पोहोचला; 3 वर्ष सुरू असलेली केस कर्नाटक कोर्टाने अखेर लावली निकाली

Jyoti Kadam

कर्नाटकमध्ये मुलाच्या नावावरून एका जोडप्यामधील वाद इतका वाढला की प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचले. प्रकरण इतके वाढले की हे प्रकरण उच्च न्यायालयात पोहोचले. आनंदाची बाब म्हणजे उच्च न्यायालयाने हा वाद मिटवला आणि पती-पत्नी पुन्हा एकत्र आले.

Illegal Schools in Thane: ठाण्यातील 65 'बेकायदेशीर' शाळा बंद करण्याची MESTA ची मागणी; दिली 23 डिसेंबरपासून आंदोलनाची धमकी

Prashant Joshi

हा प्रश्न व्यापक असल्याचे मेस्टा अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी सांगितले, केवळ ठाणे जिल्ह्यात 65 बेकायदा शाळा सुरू आहेत. राज्यभरात अशा शाळांची संख्या किमान 5 हजार असेल.

Advertisement

Sanatan Temple Board: मुस्लिम वक्फ बोर्डाच्या धर्तीवर सनातन मंदिर मंडळाची निर्मिती करण्याची मागणी; एक हजार हिंदू मंदिरांचे विश्वस्त आणि प्रतिनिधी शिर्डीमध्ये येणार एकत्र

Prashant Joshi

महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद, हिंदु जनजागृती समिती, विरार येथील श्री जीवदानी देवी मंदिर आणि पुण्यातील भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर यांच्या वतीने आयोजित या बैठकीला अष्टविनायक मंदिरे, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदि, देहू देवस्थान आदी प्रमुख मंदिरांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Devkisan Sarda Passes Away: दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Prashant Joshi

देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

Violence Against Hindus in Bangladesh: बांगलादेशात हिंदूंवर 2,200 आणि पाकिस्तानमध्ये 112 हिंसाचाराची प्रकरणे; केंद्र सरकारने जारी केली धक्कादायक आकडेवारी

Prashant Joshi

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्री कीर्ती वर्धन सिंग म्हणाले की त्यांच्या वतीने त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पत्रे लिहून त्यांच्या देशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.

Rapido App Data Leak: रॅपिडो ॲपवरून हजारो ड्रायव्हर्स आणि यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक; कंपनीने दूर केली त्रूटी

Bhakti Aghav

ॲपमधील या समस्येमुळे युजर्स आणि ड्रायव्हरची पूर्ण नावे, ई-मेल पत्ते आणि फोन नंबर लीक झाले. एका सुरक्षा संशोधकाने या समस्येबद्दल माहिती दिली होती. तथापि, आता कंपनीने ॲपमधील ही मोठी त्रुटी दूर केली आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, सुरक्षा संशोधक रंगनाथन पी यांना रॅपिडोच्या वेबसाइटवर फीडबॅक फॉर्ममध्ये त्रुटी आढळली होती.

Advertisement

Maharashtra Congress New Chief: 'महाराष्ट्र काँग्रेसला लवकरच मिळणार नवा अध्यक्ष'- Nana Patole

Prashant Joshi

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू असलेल्या नागपूर येथील विधान भवन संकुलात पटोले पत्रकारांशी बोलत होते. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसच्या नव्या अध्यक्षाबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.

Malaysia Airlines Flight: 10 वर्षांपासून 239 प्रवाशांसह बेपत्ता आहे MH370 विमान; आता अमेरिकन कंपनी राबवणार शोध मोहीम

Bhakti Aghav

8 मार्च 2014 रोजी बोईंग 777 विमानाचा रडारशी संपर्क तुटला. या विमानात 239 प्रवाशी होते, त्यापैकी बहुतांश चिनी नागरिक होते. हे विमान मलेशियाची राजधानी क्वालालंपूर येथून बीजिंगला गेले होते.

Bhopal: भोपाळजवळील जंगलात उभ्या असलेल्या कारमध्ये सापडले 52 किलो सोने आणि 10 कोटी रुपये रोकड; आयकर विभागाने टाकला होता छापा

Prashant Joshi

मध्य प्रदेशात दोन दिवसांपासून लोकायुक्त आणि प्राप्तिकराचे धाडसत्र सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी आयकर विभागाने भोपाळ आणि इंदूरमधील एका बांधकाम कंपनीच्या 51 ठिकाणांवर छापे टाकले होते. आता पांढऱ्या रंगाच्या टोयोटा कारमधून सोने आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

Google Layoffs: गुगलमध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

Bhakti Aghav

Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी जाहीर केले आहे की, कंपनी संचालक आणि उपाध्यक्षांसह व्यवस्थापकीय भूमिकेतील 10 टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Advertisement

Kalyan Marathi Family: 'मराठी व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे निलंबन, कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही'- CM Devendra Fadnavis

Prashant Joshi

सीएम फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही.

Clickbait Titles and Thumbnails: बनावट शीर्षक आणि क्लिकबेट थंबनेल्स असलेल्या कंटेंटवर होणार कारवाई; YouTube काढून टाकणार असे व्हिडीओज

Prashant Joshi

आता जर एखाद्या व्हिडिओचे शीर्षक आणि थंबनेल काहीतरी वेगळा दावा करत असेल, परंतु व्हिडिओमध्ये पूर्णपणे भिन्न माहिती दिली असेल, तर असा व्हिडिओ त्वरित काढून टाकला जाईल.

भाजप सत्तेत आल्यापासून मराठी भाषिक लोकांवर हल्ले वाढले, कल्याण ही सुरुवात आहे; Sanjay Raut यांचे खळबळजनक वक्तव्य

Bhakti Aghav

मराठी भाषिक लोकांना (Marathi-speaking People) मुंबई आणि शेजारच्या भागातून हाकलण्यासाठी वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप शिवसेना यूबीटी नेते संजय राऊत (UBT Leader Sanjay Raut) यांनी शुक्रवारी केला. पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथील घटनेवर प्रकाश टाकला.

Cocktail 2: कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये क्रिती सेनॉनची एंट्री, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत झळकणार

Jyoti Kadam

रोमेंटिक कॉमेडी सिक्वेल 'कॉकटेल 2' बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे.

Advertisement

NZ W vs AUS W 2nd ODI 2024 Preview: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यात चुरशीची स्पर्धा होणार, सामन्यापूर्वी जाणून घ्या हेड टू हेड रेकॉर्ड, मिनी बॅटल, स्ट्रीमिंग यासह सर्व तपशील

Amol More

Mathura's Banke Bihari Temple Dress Code: 'मिनी स्कर्ट, फाटलेली जीन्स घालून प्रवेश नाही'; मथुरेच्या बांके बिहारी मंदिराने भक्तांसाठी लागू केला ड्रेस कोड

Prashant Joshi

मंदिर प्रशासनाने दर्शनासाठी येणाऱ्यांना असे आवाहन करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही यूपीच्या ठाकूर बांके बिहारी मंदिर आणि ब्रजच्या अनेक मंदिरांनीही मंदिर प्रशासनाने भाविकांना लहान कपडे परिधान न करण्याचे आवाहन केले आहे.

Sanjay Raut: संजय राऊत यांच्या घराची रेकी, आरोपी हेल्मेट आणि मास्कमध्ये दिसले; एफआयआर दाखल (Watch Video)

Jyoti Kadam

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या घराबाहेर अज्ञातांकडून रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे

Kalyan Satta Matka Mumbai Results: मेन रतन चार्ट काय आहे? जाणून घ्या काही ठळक गोष्टी

टीम लेटेस्टली

कल्याण सट्टा मटका (Kalyan Satta Matka) भारतातील असा एक खेळ आहे, जो कमी वेळात अधिक पैसे देण्याच्या कल्पनेने लोकांना भारुन टाकतो. पण, या खेळात पैसे कमावण्याचे आमीश म्हणजे मोठ्या प्रमाणावर जोखीम उचलने होय.

Advertisement
Advertisement