Illegal Schools in Thane: ठाण्यातील 65 'बेकायदेशीर' शाळा बंद करण्याची MESTA ची मागणी; दिली 23 डिसेंबरपासून आंदोलनाची धमकी

राज्यभरात अशा शाळांची संख्या किमान 5 हजार असेल.

School students. (Credits: PTI | Representational Image)

Illegal Schools in Thane: महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनने (MESTA)  ठाणे (Thane) जिल्ह्यात सुरू असलेल्या 65 कथित ‘बेकायदेशीर’ शाळा बंद करण्याची मागणी केली आहे. ठाणे महानगरपालिका (TMC) ‘अनधिकृत शाळांवर’ केलेल्या कारवाईचा लेखी पुरावा देत नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील अधिकृत शाळा 23 डिसेंबरपासून बंद ठेवून आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. आपल्या अधिकारक्षेत्रात कार्यरत असलेल्या अनधिकृत शाळा बंद करण्यास असमर्थता दर्शविल्याबद्दल टीएमसीवर टीकेची झोड उठली आहे. तसेच यामुळे शिक्षण हितधारक सरकारच्या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करत आहेत.

MESTA नुसार, गेल्या वर्षीच्या 40 पेक्षा सध्या ठाणे जिल्ह्यात 65 अनधिकृत शाळा कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजावर अंकुश ठेवण्यासाठी कोणतीही महत्त्वपूर्ण उपाययोजना केलेली नाही.

राज्यभरात अशा शाळांची संख्या किमान 5 हजार असण्याची शक्यता-

फ्री प्रेस जर्नलच्या अहवालानुसार, हा प्रश्न व्यापक असल्याचे मेस्टा अध्यक्ष संजयराव तायडे पाटील यांनी सांगितले, केवळ ठाणे जिल्ह्यात 65 बेकायदा शाळा सुरू आहेत. राज्यभरात अशा शाळांची संख्या किमान 5 हजार असेल. टीएमसीने या शाळांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांना पत्र लिहिले होते, परंतु पोलिसांनी अद्याप त्यांचा तपास सुरू केलेला नाही. पाटील यांनी चेतावणी दिली की, विद्यार्थ्यांचे पुढील प्रवेश चक्र जवळ येत असताना विलंबामुळे प्रकरणे आणखी गुंतागुंतीची होऊ शकतात. अशा शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश जवळच्या कायदेशीर शाळांमध्ये हस्तांतरित करणे हे राज्य सरकारचे कर्तव्य आहे. (हेही वाचा: Nashik Education News: नाशिक जिल्ह्यातील अंबुपाडा आश्रमशाळेत शिक्षकांची कमतरता, विद्यार्थ्यांचे नुकसान) 

महापालिका आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव-

मेस्टा ठाणे जिल्ह्याचे सहसचिव उत्तम सावंत यांनी फ्री प्रेस जर्नलशी बोलताना,  महापालिका आणि पोलीस यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याची टीका केली. परवानगी न घेता अशा शाळा सुरू झाल्या. ते म्हणाले, गेल्या वर्षीपर्यंत अशा शाळांची संख्या 40 होती. त्यावेळीही टीएमसीने त्यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्यासाठी पोलिसांना पत्र लिहिले होते. मात्र कोणतीही कारवाई झाली नसल्याने यामध्ये 25 नवीन शाळांची भर पडली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif