Rapido App Data Leak: रॅपिडो ॲपवरून हजारो ड्रायव्हर्स आणि यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक; कंपनीने दूर केली त्रूटी
एका सुरक्षा संशोधकाने या समस्येबद्दल माहिती दिली होती. तथापि, आता कंपनीने ॲपमधील ही मोठी त्रुटी दूर केली आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, सुरक्षा संशोधक रंगनाथन पी यांना रॅपिडोच्या वेबसाइटवर फीडबॅक फॉर्ममध्ये त्रुटी आढळली होती.
Rapido App Data Leak: बेंगळुरू-आधारित राइड-हेलिंग प्लॅटफॉर्म रॅपिडोने (Rapido) ने ॲपमधील प्रमुख समस्या सोडवली आहे. अलीकडे, राइड सर्व्हिस प्रोव्हायडरचे वापरकर्ते आणि चालकांचे तपशील ऑनलाइन लीक झाले होते. ॲपमधील या समस्येमुळे युजर्स आणि ड्रायव्हरची पूर्ण नावे, ई-मेल पत्ते आणि फोन नंबर लीक झाले. एका सुरक्षा संशोधकाने या समस्येबद्दल माहिती दिली होती. तथापि, आता कंपनीने ॲपमधील ही मोठी त्रुटी दूर केली आहे. टेकक्रंचच्या अहवालानुसार, सुरक्षा संशोधक रंगनाथन पी यांना रॅपिडोच्या वेबसाइटवर फीडबॅक फॉर्ममध्ये त्रुटी आढळली होती.
लीक झालेली माहिती Rapido च्या API शी जोडण्यात आली -
रंगनाथन पी यांनी सांगितले की, लीक झालेली माहिती Rapido च्या API शी जोडलेली होती, जी फीडबॅक फॉर्ममधून माहिती गोळा करण्यासाठी आणि ती तृतीय-पक्ष सेवेसह सामायिक करण्यासाठी डिझाइन केली गेली होती. TechCrunch ने फीडबॅक फॉर्मद्वारे अहवालाची पुष्टी करणारा एक सामान्य संदेश पाठवला, जो थोड्या वेळाने लीक झालेल्या पोर्टलमध्ये दिसला. अहवालानुसार, लीक झालेल्या पोर्टलमध्ये 1,800 हून अधिक फीडबॅक प्रतिसाद आहेत, ज्यात अनेक ड्रायव्हर्सचे फोन नंबर आणि काही ईमेल पत्ते समाविष्ट आहेत. (हेही वाचा -Clickbait Titles and Thumbnails: बनावट शीर्षक आणि क्लिकबेट थंबनेल्स असलेल्या कंटेंटवर होणार कारवाई; YouTube काढून टाकणार असे व्हिडीओज)
मोठा घोटाळ्याची शक्यता - रंगनाथन पी
संशोधकाने चेतावणी दिली की, ही माहिती लिक झाल्याने मोठा घोटाळा होण्याची शक्यता आहे. ज्यामध्ये फसवणूक करणारे किंवा हॅकर्स ड्रायव्हर्सना कॉल करू शकतात आणि मोठ्या प्रमाणात डिजिटल अरेस्ट करू शकतात किंवा हे फोन नंबर आणि इतर डेटा डार्क वेबवर विकू शकतात. तथापि, रॅपिडोने आता वापरकर्ते आणि सेवा पुरवठादारांची महत्त्वाची माहिती लपवली आहे, ज्यामुळे हॅकिंगचा कोणताही धोका राहणार नाही. (हेही वाचा: Indian Govt Blocked 18 OTT Platforms: केंद्र सरकारने ब्लॉक केले 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्स; अश्लील मजकूर प्रकाशित केल्याचा आरोप)
डेटा लीकमुळे रॅपिडो चौकशीच्या कक्षेत -
डेटा लीकबद्दल टेकक्रंचने रॅपिडोशी संपर्क साधला तेव्हा कंपनीने लीक झालेले पोर्टल खाजगी केले. सध्या रॅपिडोने या विषयावर कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. सध्या उबेर आणि ओलाला परवडणारा पर्याय मानला जाणारा रॅपिडो आता या डेटा लीकमुळे चौकशीच्या कक्षेत आहे. दरम्यान, रॅपिडोचे सीईओ अरविंद शनाका यांनी सांगितले की, मानक ऑपरेटिंग प्रक्रिया म्हणून आम्ही वापरकर्त्यांकडून फीडबॅक घेतो. हा फीडबॅक तृतीय पक्ष कंपनीद्वारे व्यवस्थापित केला जातो. थर्ड पार्टी मॅनेजमेंटमुळे यूजर्सची वैयक्तिक माहिती लीक झाली आहे.