Kalyan Marathi Family: 'मराठी व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्लाचे निलंबन, कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही'- CM Devendra Fadnavis
सीएम फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही.
Kalyan Marathi Family: महाराष्ट्रातील कल्याणमध्ये एका मराठी कुटुंबावर झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणाने जोर पकडला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेवर तीव्र आक्षेप घेत कारवाई करण्याबाबत भाष्य केले होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी मराठी व्यक्तीवर हल्ला करणाऱ्या पती-पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगितले. आरोपीला सरकारी नोकरीतून निलंबित करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. अखिलेश शुक्ला असे मुख्य आरोपीचे नाव असून तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात (एमटीडीसी) कार्यरत आहे. शिवसेना-यूबीटी नेते अनिल परब यांनी विधान परिषदेत हा मुद्दा उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना फडणवीस यांनी ही माहिती दिली.
याला दिलेल्या उत्तरात सीएम फडणवीस यांनी सांगितले की, मुंबई ही मराठी माणसांची अस्मिता आहे. कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, एखाद्याचा आहार कोणत्या पद्धतीचा, प्रकारचा असावा याचे स्वातंत्र्य संविधानाने दिले आहे. पण अशा प्रकारे रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. या आधारावर भेदभाव मान्य नाही. अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (हेही वाचा: Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार)
'कुठल्याही परिस्थितीत मराठी माणसांवर अन्याय होऊ देणार नाही'-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)