Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार

कल्याण येथे मराठी कुटुंबास झालेल्या मारहाण प्रकरणाचे गंभीर पडसाद विधिमंडळ सभागृहात उमटले. या प्रकरणात कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन अजित पवार यांनी विरोधकांना दिले.

Kalyan Marathi Family: मराठी माणसाचा सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाईल: अजित पवार
Ajit Pawar | X

विधिमंडळ सभागृहातील भाषणातील मुद्दे एक्स पोस्टवर सामायिक करत अजित पवार यांनी म्हटले की, काल कल्याणच्या योगीधाम परिसरातील अजमेरा हाइट्स या सोसायटीत झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, मराठी माणसांविषयी अपमानजनक शेरेबाजी करणाऱ्या अमराठी व्यक्तीने प्रशासनातील उच्च पदाचा गैरवापर करून मराठी माणसांच्या अस्मितेला ठेच पोहोचवणारे वक्तव्य केले आहे.

आज विधानसभेत आपत्कालीन चर्चेत या प्रकरणावर बोलताना, 'महाराष्ट्र हा शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात मराठी माणसावर कोणत्याही प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. कल्याण प्रकरणाचा तपास घेऊन संबंधित व्यक्तीवर त्याच्या पदाची आणि सामाजिक ओळखीची काहीही हयगय न करता योग्य कारवाई केली जाईल. त्यासंदर्भात त्वरित कारवाई करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात येतील. प्रशासनाकडून महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाचा मान आणि सन्मान कायम राखण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेतली जाईल, अशी ग्वाही दिली. (हेही वाचा, Akhilesh Shukla Suspended: मराठी कुटुंबावर हल्ला करणारा अखिलेश शुक्ला निलंबित; ‘महाराष्ट्र मराठी जनतेचा’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून घटनेचा निषेध (Video))

अजित पवार यांचा कडक कारवाईचा ईशारा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 20, 2024 04:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).