Google Layoffs: गुगलमध्ये 10 टक्के नोकर कपातीची घोषणा; 'या' कर्मचाऱ्यांवर होणार परिणाम

Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी जाहीर केले आहे की, कंपनी संचालक आणि उपाध्यक्षांसह व्यवस्थापकीय भूमिकेतील 10 टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

Layoffs (फोटो सौजन्य - Pixabay)

Google Layoffs: गुगल व्यवस्थापनाने आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्याची घोषणा केली आहे. Google चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी जाहीर केले आहे की, कंपनी संचालक आणि उपाध्यक्षांसह व्यवस्थापकीय भूमिकेतील 10 टक्के नोकऱ्या कमी करणार आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेकांना नोकरीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, ओपनएआय सारख्या स्पर्धकांकडून AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) मधील वाढती स्पर्धा पाहता गुगलने हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.

सीईओ पिचाई यांनी सांगितले की, गुगलने गेल्या काही वर्षांत कंपनीला कार्यक्षम बनवण्यासाठी आणि पायाभूत सुविधा सुलभ करण्यासाठी अनेक बदल केले आहेत. अहवालात गुगलच्या प्रवक्त्याचा हवाला देऊन म्हटले आहे की, 10 टक्के आकड्यांपैकी काही नोकऱ्या वैयक्तिक योगदानकर्त्यांच्या भूमिकेत हलवण्यात आल्या आहेत. काहींना भूमिकेतून काढून टाकण्यात आले. गेल्या जानेवारीत गुगलने 12000 नोकऱ्या कमी केल्या होत्या. (हेही वाचा -Tech Layoffs: यंदा 2024 मध्ये 149,000 पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी गमावली आपली नोकरी; Intel, Tesla, Cisco, Microsoft सह अनेक बड्या कंपन्यांमध्ये झाली मोठी नोकरकपात)

गुगलचे जनरेटिव्ह एआय फीचर्स -

गुगलचा सध्याचा टाळेबंदीचा निर्णय त्याच्या ओपनएआय सारख्या AI प्रतिस्पर्ध्यांशी संरेखित आहे, जे नवीन उत्पादने आणत आहे. ही नवीन उत्पादने Google च्या सर्च व्यवसायावर परिणाम करू शकतात. ओपनएआयच्या स्पर्धेला प्रतिसाद म्हणून गुगलने जनरेटिव्ह एआय फीचर्स आणले आहेत. गेल्या बुधवारच्या बैठकीत, पिचाई यांनी Googleness या शब्दाचा अर्थ स्पष्ट केला आणि नमूद केले की, कर्मचाऱ्यांना आधुनिक Google वर अपडेट करणे आवश्यक आहे. (हेही वाचा -Bosch Layoffs: बॉश 7 हजार कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचे संकट, कंपनीमध्ये होणार नोकर कपात)

मे महिन्यात 200 जणांना नारळ -

दरम्यान, याआधी मे 2024 मध्ये, Google ने आपल्या मुख्य कार्यसंघातून 200 नोकऱ्या कमी केल्या होत्या. तथापी, खर्च कमी करण्याच्या पुनर्रचना प्रक्रियेचा एक भाग म्हणून काही नोकऱ्या परदेशात हलवल्या. कॅलिफोर्नियातील अभियांत्रिकी संघातून सुमारे 50 नोकऱ्या कापण्यात आल्याचेही वृत्त आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now