Violence Against Hindus in Bangladesh: बांगलादेशात हिंदूंवर 2,200 आणि पाकिस्तानमध्ये 112 हिंसाचाराची प्रकरणे; केंद्र सरकारने जारी केली धक्कादायक आकडेवारी

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्री कीर्ती वर्धन सिंग म्हणाले की त्यांच्या वतीने त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पत्रे लिहून त्यांच्या देशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे.

File Image of Bangladesh Protesters (Photo Credits: X/@isteheeeer)

Violence Against Hindus in Bangladesh: शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर बांगलादेशात (Bangladesh) अल्पसंख्याकांवर मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे, परंतु मोहम्मद युनूस यांचे अंतरिम सरकार हे मानायला तयार नाही. आता परराष्ट्र राज्यमंत्री कीर्ती वर्धन यांनी संसदेत एका लेखी उत्तरात सांगितले की, या वर्षी 8 डिसेंबरपर्यंत बांगलादेशात हिंदूंवर (Hindus) आणि इतर अल्पसंख्याकांवर 2200 हल्ले झाले आहेत, तर पाकिस्तानमध्ये असे 112 हल्ले झाले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, बांगलादेश हा नवा पाकिस्तान बनला आहे, जिथे हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांवर अतोनात अत्याचार केले जात आहेत.

राज्यसभेत आकडेवारी सादर करताना परराष्ट्र मंत्री कीर्ती वर्धन सिंग म्हणाले की त्यांच्या वतीने त्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना पत्रे लिहून त्यांच्या देशात हिंदूंची सुरक्षा सुनिश्चित करण्याची विनंती केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारत सरकारने या घटना गांभीर्याने घेतल्या असून, शेजारील देशांच्या सरकारांकडे चिंता व्यक्त केली आहे.

बांगलादेश सरकार अल्पसंख्याक हिंदूंच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करेल, अशी भारताला आशा आहे. परराष्ट्र सचिवांच्या बांगलादेश दौऱ्यातही हाच संदेश देण्यात आला होता. ढाका येथील भारतीय दूतावासही या हल्ल्यांच्या घटनांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आकडेवारी सादर करताना परराष्ट्रमंत्र्यांनी बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वर्षी किती हल्ले झाले त्याबाबत तपशील जारी केला. (हेही वाचा: Kailash Mansarovar Yatra: शिवभक्तांसाठी खुशखबर! लवकरच सुरु होऊ शकते कैलास मानसरोवर यात्रा, भारत आणि चीनमध्ये झाला मोठा करार)

2022- बांगलादेशात 47, तर पाकिस्तानमध्ये 241

2021- बांगलादेशात 302, तर पाकिस्तानमध्ये 103

2024- बांगलादेशात 2200, तर पाकिस्तानमध्ये 112

बांगलादेश आणि पाकिस्तान वगळता इतर कोणत्याही शेजारी देशात हिंदूंविरुद्ध हिंसाचाराची कोणतीही घटना घडलेली नाही, असेही सरकारने म्हटले आहे. इतर शेजारी देशांमध्ये (पाकिस्तान आणि बांगलादेश वगळता) हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांविरुद्ध हिंसाचाराची शून्य प्रकरणे आहेत. भारताला आशा आहे की, बांगलादेश सरकार हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलेल.