Devkisan Sarda Passes Away: दैनिक ‘देशदूत’चे संस्थापक आणि प्रख्यात उद्योजक देवकिसन सारडा यांचे निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
Devkisan Sarda Passes Away: उद्योगपती आणि ‘देशदूत’ या मराठी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक देवकिसन सारडा यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांनी ही माहिती दिली. ते 92 वर्षांचे होते. सह्याद्री रुग्णालयात दुपारी 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थीवावर नाशिक अमरधाम येथील विद्यूत दाहीनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. सारडा यांना दोन मुले आणि दोन मुली आहेत. त्यांनी 1959 मध्ये श्री सिन्नर मर्चंट बँकेची स्थापना केली आणि 1963 ते 1967 पर्यंत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम पाहिले. सारडा यांचे नाशिक शहर, जिल्हा आणि महाराष्ट्राच्या औद्योगिक, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील योगदान मोठे आहे. नाशिक, अहमदनगर, सोलापूर व बुलढाणा जिल्ह्यांतील नागरी सहकारी बँका सुरू होण्यास त्यांचा हातभार लागला आहे. सहकार चळवळ वाढविण्यात आणि रूजविण्यात त्यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.
देवकिसन सारडा यांचे निधन-
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)