Cocktail 2: कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये क्रिती सेनॉनची एंट्री, शाहिद कपूर आणि रश्मिका मंदाना यांच्यासोबत झळकणार

रोमेंटिक कॉमेडी सिक्वेल 'कॉकटेल 2' बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. कॉकटेलच्या सिक्वेलमध्ये शाहिद कपूर आणि रश्मिका मंदान्ना यांच्यासोबत क्रिती सेनॉन दिसणार आहे.

Photo Credit- X

Cocktail 2: रोमेंटिक कॉमेडी सिक्वेल 'कॉकटेल 2' (Cocktail 2)बाबत नवीन अपडेट समोर आली आहे. चित्रपटात शाहिद कपूर (Shahid Kapoor) मुख्य भूमिकेत दिसणार आहे, तर त्याच्यासोबत रश्मिका मंदाना आणि क्रिती सेनॉन (Kriti Sanon)दिसणार आहे. ही त्रिकोणी प्रेमकथा असणार आहे. रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)ही आधीच चित्रपटाचा भाग होती. परंतु आता क्रिती सॅनन देखील या चित्रपटात शाहिदच्या विरूद्ध लीड म्हणून कास्ट करण्यात आले आहे. चित्रपटाच्या माध्यामतून क्रिती आणि शाहिद दुसऱ्यांदा एकत्र दिसणार आहेत. यांची जोडी यापूर्वी 'तेरी बातों में ऐसा उल्झा जिया' मध्ये दिसली होती. हा चित्रपट प्रेम आणि नातेसंबंधांवर आधारीत एक कथा दर्शवत होता. आण चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होणार आहे. (Beandri Booysen Dies at 19: दक्षिण आफ्रिकेचा टिकटॉक स्टार बियांद्री बॉयसेनचे प्रोजेरिया या दुर्मिळ आजारामुळे निधन)

शाहिदच्या 'कॉकटेल 2'मध्ये क्रिती सेनॉनची एन्ट्री

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Movified (@movifiedbollywood)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now