ठळक बातम्या

Generation Beta: आता Gen Alpha आणि Gen Z चा काळ झाला जुना; 2025 पासून येणार जनरेशन बीटा; जाणून घ्या काय असेल खास

Prashant Joshi

तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभाव जनरेशन बीटा मुलांच्या जीवनात खूप खोल असेल. ही पिढी आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल कनेक्टिव्हिटीसह त्यांच्या दैनंदिन जीवनात टिकून राहील. अशा स्थितीत ही पिढी तात्काळ कृती करून नवीन विचार अंगिकारण्यास सक्षम होईल, असे म्हणता येईल.

Sikandar Released On 5 Thousand Screens: सलमान खानच्या 'सिकंदर'ला 'पुष्पा 2' पेक्षा जास्त मिळाले स्क्रीन

Amol More

हा चित्रपट फक्त हिंदी भाषेत 5 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. तर अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' जगभरात 12 हजार स्क्रीन्सवर रिलीज झाला होता. पण हिंदीत या चित्रपटाला 4500 स्क्रीन्स मिळाल्या.

Lucknow Shocker: बॉयफ्रेंडसोबत गप्पा मारण्यासाठी 15 वर्षांच्या मुलीने आईला 3 महिने दिल्या झोपेच्या गोळ्या; लखनऊमधील धक्कादायक प्रकार

Prashant Joshi

लखनौच्या कृष्णनगरमध्ये राहणारी 15 वर्षांची मुलगी गेल्या तीन महिन्यांपासून सतत तिच्या आईला झोपेच्या गोळ्या देत होती. आईला गाढ झोप लागावी म्हणून ती दररोज तीन ते चार गोळ्या खाण्यापिण्यात मिसळून आईला देत होती.

Jasprit Bumrah New Milestone: जसप्रीत बुमराहने मेलबर्न कसोटीत रचला इतिहास, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अशी अनोखी कामगिरी करणारा ठरला पहिला वेगवान गोलंदाज

Amol More

टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 149 विकेट्स आणि आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 89 विकेट घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहची दमदार कामगिरी पाहून ICC ने जसप्रीत बुमराहला क्रिकेटर ऑफ द इयर आणि टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकन दिले आहे.

Advertisement

Indian Gold Reserves: भारतीय महिलांकडे आहे जगातील 11% सोने; सर्वोच्च 5 देशांच्या एकत्रित साठ्यापेक्षा जास्त, रिपोर्टमध्ये खुलासा

Prashant Joshi

जर तुलना करायची झाली तर, अमेरिकेकडे 8,000 टन, जर्मनीकडे 3,300 टन, इटलीकडे 2,450 टन, फ्रान्सकडे 2,400 टन आणि रशियाकडे 1,900 टन सोने आहे. याचा अर्थ या देशांतील सोन्याचा साठा एकत्र केला तर तो भारतीय महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा कमी आहे.

Test Matches For Team India In 2025: भारत 2025 मध्ये या संघांविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे, पहा पूर्ण वेळापत्रक

Amol More

इंग्लंड दौऱ्यावर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दोन्ही संघांमधील ही कसोटी मालिका भारतीय भूमीवर खेळवली जाणार आहे. यानंतर भारतीय संघ मायदेशात दुसरी मालिका खेळणार आहे.

RAF ASI Died After Hit By Train: फोनवर बोलताना रेल्वेच्या धडकेने आरएएफ अधिकाऱ्याचा मृत्यू, अलिगड रेल्वे स्थानकावरील घटना (Watch Video)

Bhakti Aghav

एएसआय बिंदा राय हे मूळच्या सैनिक कॉलनी, दानापूर रोड, पाटणा जिल्ह्यातील बिहार येथील रहिवासी आहेत. ते अलीगडच्या 104 बटालियनमध्ये तैनात होते. सुट्टीवर घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले होते.

HC on 'Jija' & 'Sali' Relation: मेहुणा आणि मेहुणीचे संबंध अनैतिक, मात्र संमती असल्यास बलात्कार म्हणता येणार नाही- Allahabad High Court

Prashant Joshi

न्यायमूर्ती समीर जैन यांच्या एकल खंडपीठाने या दोघांचे नाते सामाजिक आणि नैतिक दृष्टिकोनातून चुकीचे असल्याचे मान्य केले. मात्र न्यायालयाने म्हटले की, ही महिला प्रौढ आहे आणि तिने संमतीने हे नाते जोडले होते, त्यामुळे ते बलात्काराच्या गुन्ह्याच्या कक्षेत येत नाही.

Advertisement

ICC Men's Test Cricketer of the Year: आयसीसी क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार कोणाला मिळणार? या 4 स्टार खेळाडूंची निवड; यादीत एका भारतीयाचा समावेश

Amol More

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये जसप्रीत बुमराहची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. आतापर्यंत जसप्रीत बुमराहने 4 सामन्यात 12.83 च्या सरासरीने 30 फलंदाजांना बाद केले आहे.

IND vs AUS 5th Test: रोहित, सिराज आणि आकाशदीपला मिळणार डच्चू ! या खेळाडूंना मिळेल संधी, सिडनी कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11

Amol More

सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.

Cigarette Side Effects: सावधान! प्रत्येक सिगारेट पुरुषांच्या आयुष्यातील 17 आणि महिलांच्या आयुष्यातील 22 मिनिटे वाया घालवते; अभ्यासात धक्कादायक खुलासा

Bhakti Aghav

पुरुष प्रत्येक सिगारेटने त्यांच्या आयुष्यातील 17 मिनिटे गमावतात तर स्त्रिया 22 मिनिटे गमावतात, असं या संशोधनातून उघडकीस आलं आहे. संशोधनातून समोर आलेला नवीन अंदाज मागील आकड्यांपेक्षा जास्त आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, प्रत्येक सिगारेट धूम्रपान करणाऱ्याचे आयुष्य 11 मिनिटांनी कमी करते.

Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध; फर्ग्युसन कॉलेज रोड, एम.जी. रोड असेल 'नो व्हेईकल झोन'

Prashant Joshi

पुण्यात 31 डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) एका व्यक्तिसाठी एक पाईप (युज ॲण्ड थ्रो) वापरण्यात येणार आहे.

Advertisement

Rohit Sharma To Announce Test Retirement: सिडनी कसोटीनंतर रोहित शर्मा कसोटी क्रिकेटला म्हणू शकतो अलविदा

Amol More

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला बॉक्सिंग डे कसोटीच्या दोन्ही डावात दुहेरी आकडाही गाठता आला नाही. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मासाठी हे वर्ष खूप वाईट गेले. सध्याच्या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने तीन कसोटी सामन्यांच्या पाच डावात 6.20 च्या अत्यंत खराब सरासरीने एकूण 31 धावा केल्या.

Indian Student Found Dead In Scotland: स्कॉटलंडमधील नदीत सापडला 22 वर्षीय बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह

Bhakti Aghav

संत्रा साजू असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. केरळमधील संत्रा साजूने स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथील हेरियट-वॅट विद्यापीठात शिक्षण घेतले. स्कॉटलंड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एडिनबर्गजवळील न्यूब्रिज गावाजवळील नदीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

Zimbabwe vs Afghanistan, 1st Test Day 5 Scorecard: अफगाणिस्तानचा पहिला डाव 699 धावांवर आटोपला, हशमतुल्ला शाहिदी आणि रहमत शाह यांनी झळकावली द्विशतके

Amol More

हशमतुल्ला शाहिदीशिवाय रहमत शाहने 234 धावा केल्या. या स्फोटक खेळीदरम्यान रहमत शाहने 424 चेंडूत 23 चौकार आणि तीन षटकार ठोकले. तिसऱ्या विकेटसाठी दोन्ही फलंदाजांनी 364 धावांची चांगली भागीदारी केली.

New Year 2025 Celebrations in Mumbai: मुंबईत नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला BEST चालवणार हेरिटेज टूर आणि समुद्र किनाऱ्यांवर अतिरिक्त बसेस; जाणून घ्या सविस्तर

Prashant Joshi

नववर्ष स्वागतासाठी' गेट वे ऑफ इंडिया, जुहू चौपाटी, गोराई बीच, मार्वे बीच आणि मुंबईतील इतर समुद्र किनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी येणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी, बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध बसमार्गांवर रात्री एकूण 25 जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.

Advertisement

Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले

Bhakti Aghav

पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सभेला संबोधित करताना नितीश राणे म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडून येतात. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. हे खरे आहे. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत.'

Pushpa 2 Box Office Collection: अल्लू अर्जुनच्या ब्लॉकबस्टर 'पुष्पा 2' 800 कोटींच्या जवळ, चित्रपटाची दमदार कामगिरी सुरूच

Amol More

चित्रपटाच्या उत्कृष्ट बॉक्स ऑफिस कलेक्शनमुळे तो 2024 च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक बनला आहे. येत्या आठवडाभरात हा चित्रपट आणखी काय कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Afghanistan: अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे महिलांसाठी आणखी एक फर्मान; घातली घरातील खिडक्यांवर बंदी, जाणून घ्या कारण

Prashant Joshi

गेल्या काही महिन्यांमध्ये तालिबानने महिलांवर इतके निर्बंध लादले आहेत, की त्यांचे जीवन जगणे अवघड झाले आहेत. आता तालिबान नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने आदेश दिला आहे की, इमारतींमध्ये महिला बसू शकतील किंवा उभ्या राहू शकतील अशा खिडक्या नसाव्यात.

Pune Female Teacher Sex With Student: पुणे अवाक! मास्तरीन बाईंचे विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध; POCSO कायद्यानुसार गुन्‍हा दाखल

Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

महिला शिक्षकाने विद्यार्थ्यासोबत सेक्स केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ज्यामुळे खळबळ उडाली असून पुणे पोलिसांनी सदर महिलेस अटक केली आहे. तिच्यावर पॉक्‍सो (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisement
Advertisement