Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे पोलिसांनी जारी केले वाहतूक निर्बंध; फर्ग्युसन कॉलेज रोड, एम.जी. रोड असेल 'नो व्हेईकल झोन'
सदर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) एका व्यक्तिसाठी एक पाईप (युज ॲण्ड थ्रो) वापरण्यात येणार आहे.
Pune New Year’s Eve Traffic Advisory: नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येसाठी पुणे (Pune) शहर पोलिसांनी जनतेसाठी वाहतूक निर्बंध जारी केले आहेत. हे वाहतूक बदल 31 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजल्यापासून जमाव पांगापांग होईपर्यंत लागू होतील. पुणे शहरातील लष्कर (कॅम्प) भागातील महात्मा गांधी रस्त्यावर तसेच डेक्कन वाहतूक विभागांतर्गत, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर वर्ष अखेर व नूतन वर्षारंभचे आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर भागातील रस्त्यांवर वाहनांची मोठ्या प्रमाणात रहदारी वाढून वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीमध्ये बदल करण्यात येत आहेत.
उद्या 31 डिसेंबर 2024 रोजी नुतन वर्ष आगमनानिमित्त पुणे कॅम्प (लष्कर) व डेक्कन, शिवाजीनगर परिसरात पुढील वाहतूक बदल करण्यात येत आहेत.
महात्मा गांधी रोड, लष्कर (कॅम्प) परिसर-
वाय जंक्शन वरुन महात्मा गांधी रस्त्याकडे येणारी वाहतुक ही 15 ऑगस्ट चौक येथे बंद करुन, ती कुरेशी मस्जिद व सुजाता मस्तानी चौकाकडे वळविण्यात येणार आहे.
ईस्कॉन मंदिर चौकाकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, अरोरा टॉवरकडे जाणारी वाहतुक ही बंद करण्यात येणार आहे.
व्होल्गा चौकाकडून महंमदरफी चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक सरळईस्ट स्ट्रीट रोडने इंदिरा गांधी चौकाकडे सोडण्यात येईल.
इंदिरा गांधी चौकातून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक इंदिरागांधी चौकातून लष्कर पोलीस स्टेशन चौकाकडे वळविण्यात येईल.
सरबतवाला चौकाकडून महावीर चौकाकडे जाणारी वाहतुक बंद करण्यात येणार असून सदरची वाहतुक ताबूत स्ट्रीट मार्गे पुढे सोडण्यात येईल.
फर्ग्युसन कॉलेज रोड व जंगली महाराज रोड-
फर्ग्युसन कॉलेज रोड- कोथरुड/कर्वेरोडकडुन येणारी वाहतूक खंडोजीबाबा चौक या ठिकाणी बंद करुन लॉ कॉलेज रोड, प्रभात रोड व अलका टॉकीज चौक मार्गे वळविण्यात येईल.
जंगली महाराज रोड जंगली महाराज रोडने खंडोजीबाबा चौक, गुडलक चौक व इतर लेनमधुन फर्ग्युसन कॉलेज रोडकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेप्रमाणेझाशी राणी चौक या ठिकाणी बंद करुन पुणे महानगरपालिका, ओंकारेश्वर मंदिर व शिवाजी रोड मार्गे वळविण्यात येईल.
नो व्हेईकल झोन (31 डिसेंबर 2024 संध्याकाळी 5 ते 1 जानेवारी 2025 रोजी सकाळी 5 पर्यंत)-
फर्ग्युसन रोड- गुडलक चौक ते फर्ग्युसन कॉलेज मेनगेट पर्यंत.
एम. जी. रोड- 15 ऑगस्ट चौक ते हॉटेल अरोरा टॉवर.
यासह 31 डिसेंबर रोजी वाहतूक शाखेतर्फे ‘ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह’ बाबत विशेष मोहिम राबविण्यात येणार असून, मद्य प्राशन करून वाहन चालविणा-या वाहनचालकांवर कारवाई करण्यात येणार आहे. सदर ड्रंक अॅण्ड ड्राईव्हची कारवाई करताना ब्लो पाईप (प्लास्टिक पाईप) एका व्यक्तिसाठी एक पाईप (युज ॲण्ड थ्रो) वापरण्यात येणार आहे. तरी नागरीकांनी मद्य प्राशन करुन वाहन चालवू नये असे आवाहन सर्वांना करण्यात येत आहे. उल्लघंन करणाऱ्या लोकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. (हेही वाचा: Pune New Year 2025 Celebration: पुण्यात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी 40 सेलिब्रेशन स्पॉट्स; 3,000 पोलीस आणि 700 वाहतूक कर्मचारी तैनात, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार कारवाई)
Pune New Year’s Eve Traffic Advisory:
पुणे शहरात 31 डिसेंबर रात्री 12 ते 1 जानेवारी 2025 रात्री 12 दरम्यान सर्व प्रकारचे जड/अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी. रोड रोलर, मल्टी एक्सल वाहनांसाठी) खालील ठिकाणाच्या पुढे प्रवेश बंदी करण्यात येत आहे. सर्व वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन इच्छित स्थळी जावे.
1) थेऊर फाटा, लोणीकाळभोर पासुन पुढे 2) हॅरीष ब्रिज, खडकी, 3) बोपखेल फाटा, विश्रांतवाडी 4) राधा चौक, बाणेर, 5) नवले ब्रिज, वारजे, 6) कात्रज चौक, कात्रज, 7) खडीमशीन चौक, कोंढवा, 8) मंतरवाडी फाटा, फुरसुंगी, 9) मरकळ ब्रिज पासुन पुढे प्रवेश बंद राहील.
तसेच संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालयात 31 डिसेंबर रात्री 12 ते 1 जानेवारी 2025 रात्री 12 दरम्यान दरम्यान, अत्यावश्यक सेवेतील वाहने उदा. फायरब्रिगेड, पोलीस वाहने, रुग्णवाहिका इ. वगळून, सर्व प्रकारचे जड/अवजड वाहनांना (ट्रक, डंपर, मिक्सर, बल्कर, जे.सी.बी. रोड रोलर, मल्टी एक्सल वाहनांसाठी) अंतर्गत वाहतूकीकरीता सर्व रोडवरती प्रवेश बंदी करण्यात येत आहे.