Nitesh Rane Mini-Pakistan Remark: 'केरळ मिनी पाकिस्तान, म्हणूनच राहुल-प्रियंका गांधी जिंकले...'; नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले
सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. हे खरे आहे. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत.'
Nitesh Rane Mini-Pakistan Remark: राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री आणि भाजप नेते नितीश राणे (Nitesh Rane) यांच्या 'मिनी पाकिस्तान' (Mini-Pakistan) वक्तव्यावरून राजकीय वातावरण चांगलेचं तापले आहे. राणेंच्या या वक्तव्यानंतर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधकांच्या टिकेनंतर राणेंनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. नितीश राणे यांनी भाषणात केरळची तुलना ‘मिनी पाकिस्तान’शी केली. तसेच काँग्रेस नेते प्रियंका गांधी वड्रा आणि राहुल गांधी यामुळेच निवडून आले असल्याचा दावाही त्यांनी केला. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील सभेला संबोधित करताना नितीश राणे म्हणाले, 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण तिथून निवडून येतात. सर्व दहशतवादी त्याला मतदान करतात. हे खरे आहे. दहशतवाद्यांना सोबत घेऊन ते खासदार झाले आहेत.'
नितीश राणेंनी दिलं स्पष्टीकरण -
या वक्तव्यावर झालेल्या गदारोळानंतर नितीश राणे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. नितीश राणे यांनी म्हटलं आहे की, केरळ हा भारताचाच भाग आहे. मी फक्त केरळ आणि पाकिस्तानच्या परिस्थितीची तुलना करत आहे. आमचा देश, जो हिंदु राष्ट्र आहे, ते हिंदु राष्ट्रच राहावे, अशी आमची इच्छा आहे. हिंदूंचे सर्व प्रकारे संरक्षण झाले पाहिजे. हिंदूंची घटती लोकसंख्या ही प्रत्येकाने काळजी करायला हवी. (हेही वाचा - Nitesh Rane Provocative Statement: हिंदूंकडे तिरक्या नजरेने पाहणाऱ्याला मारून टाकेल; नितीश राणेंचे प्रक्षोभक वक्तव्य, गुन्हा दाखल)
हिंदूंचे मुस्लिम आणि ख्रिश्चनमध्ये धर्मांतर करणे ही तिथली रोजची गोष्ट बनली आहे. लव्ह जिहादची प्रकरणे घडत असून हिंदू महिलांना टार्गेट केले जात आहे. तेच मी माझ्या भाषणात सांगण्याचा प्रयत्न करत होतो, असं नितीश राणे यांनी आपल्या स्पष्टीकरणात म्हटलं आहे. (हेही वाचा -BJP MLA Nitesh Rane यांच्याविरूद्ध प्रक्षोभक भाषण दिल्याच्या आरोपाखाली 2 FIRs दाखल
काँग्रेसचा भाजपवर निशाणा -
यावर प्रतिक्रिया देताना काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. तसेच नितीश राणे यांच्या मंत्रिमंडळात राहण्यावरही अतुल लोंढे यांनी प्रश्न उपस्थित केला.