RAF ASI Died After Hit By Train: फोनवर बोलताना रेल्वेच्या धडकेने आरएएफ अधिकाऱ्याचा मृत्यू, अलिगड रेल्वे स्थानकावरील घटना (Watch Video)
ते अलीगडच्या 104 बटालियनमध्ये तैनात होते. सुट्टीवर घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले होते.
RAF ASI Died After Hit By Train: रविवारी रात्री अलिगढ रेल्वे स्थानकावर (Aligarh Railway Station) एक अपघात घडला, ज्यामध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) ASI बिंदा राय यांचा ट्रेनच्या धडकेने मृत्यू झाला. एएसआय बिंदा राय हे मूळच्या सैनिक कॉलनी, दानापूर रोड, पाटणा जिल्ह्यातील बिहार येथील रहिवासी आहेत. ते अलीगडच्या 104 बटालियनमध्ये तैनात होते. सुट्टीवर घरी जाण्यासाठी स्टेशनवर पोहोचले होते.
ट्रेनमध्ये चढत असताना झाला अपघात -
बिंदा राय यांनी एसी कोचमध्ये आरक्षण केले होते आणि रविवारी रात्री कामाख्या एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी ते स्टेशनवर पोहोचले. ट्रेनमध्ये चढत असताना ते मोबाईलवर बोलत असल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान त्याचा तोल गेला आणि पाय घसरल्याने ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकल्याचे आणि लांबपर्यंत ओढले गेल्याचे दिसत आहे. या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा - Woman Hit By Railway Video: रुळ ओलांडताना महिलेला रेल्वेची धडक, RPF जवानाच्या चपळतेमुळे वाचले प्रवाशाचे प्राण, थरारक घटनेचा Video व्हायरल)
घटनास्थळी उपस्थित लोकांनी केली मदत -
दरम्यान, घटनेनंतर लगेचच स्थानकावर उपस्थित लोकांनी आणि रेल्वे पोलिसांनी जखमी एएसआयला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र जखमा इतक्या गंभीर होत्या की, त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. या अपघाताने रेल्वे स्थानकावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अपघाताची माहिती मिळताच आरएएफचे अधिकारी आणि बटालियनचे सदस्य अलीगड रेल्वे स्थानकावर पोहोचले. या घटनेची माहिती मृत एएसआयच्या कुटुंबीयांना तात्काळ देण्यात आली. सोमवारी शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पार्थिव बिहार येथील त्यांच्या वडिलोपार्जित निवासस्थानी पाठवण्यात आले. (हेही वाचा - Elephant Hit by Train Died : रेल्वेच्या धडकेत हत्तीचा मृत्यू, घटनास्थळी बघ्यांची गर्दी; झारखंडमधील घटना)
रेल्वेच्या धडकेत RAF ASI चा मृत्यू, पहा व्हिडिओ -
कुटुंबात शोकाकुल वातावरण -
एएसआय बिंदा राय यांच्या निधनाच्या वृत्ताने त्यांचे कुटुंबीय आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते सुट्टीवर घरी जात होते. मात्र, हा प्रवास त्यांचा शेवटचा ठरला. आरएएफ अधिकाऱ्यांनी कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.