Indian Student Found Dead In Scotland: स्कॉटलंडमधील नदीत सापडला 22 वर्षीय बेपत्ता भारतीय विद्यार्थिनीचा मृतदेह

संत्रा साजू असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. केरळमधील संत्रा साजूने स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथील हेरियट-वॅट विद्यापीठात शिक्षण घेतले. स्कॉटलंड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एडिनबर्गजवळील न्यूब्रिज गावाजवळील नदीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

Santra Saju (फोटो सौजन्य - X/@PSOSWestLothian)

Indian Student Found Dead In Scotland: या महिन्याच्या सुरुवातीपासून बेपत्ता असलेल्या 22 वर्षीय भारतीय विद्यार्थीनीचा (Indian Student) मृतदेह स्कॉटलंड (Scotland) मधील नदीत (River) सापडला आहे. मृतदेह सापडल्यानंतर मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. संत्रा साजू असं या मृत विद्यार्थीनीचं नाव आहे. केरळमधील संत्रा साजूने स्कॉटलंडची राजधानी एडिनबर्ग येथील हेरियट-वॅट विद्यापीठात शिक्षण घेतले. स्कॉटलंड पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एडिनबर्गजवळील न्यूब्रिज गावाजवळील नदीत मृतदेह असल्याची माहिती मिळाल्यानंतर तपास सुरू करण्यात आला.

शेवटी सुपरमार्केटमध्ये दिसली होती साजू -

अद्याप मृतदेहाची औपचारिक ओळख पटलेली नाही. तथापि, संत्रा साजू (22) च्या कुटुंबाला कळवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. स्कॉटलँडमधील पोलिसांनी निवेदनात म्हटले आहे की, शुक्रवार, 27 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11.55 च्या सुमारास, पोलिसांना न्यूब्रिजजवळ पाण्यात एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. साजूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे मानले जात नाही. यासंदर्भात एक अहवाल प्रोक्युरेटर फिस्कलला पाठविला जाईल, असंही निवेदनात सांगण्यात आलं आहे. साजू बेपत्ता झाल्यानंतर, पोलिसांनी तिच्या माहितीसाठी तातडीचे आवाहन केले होते. सीसीटीव्ही फुटेजवरून मिळालेल्या माहितीनुसार, साजूला 6 डिसेंबरच्या संध्याकाळी लिव्हिंगस्टनच्या अल्मंडवाले येथील असडा सुपरमार्केट स्टोअरमध्ये शेवटचे पाहिले गेले होते. (हेही वाचा - Indian Missing Student Found Dead In Us: अमेरिकेत आणखी एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू, गेल्या महिन्यात बेपत्ता झालेल्या मोहम्मद अब्दुल अराफातचा मृतदेह सापडला)

सुमारे एक महिन्यापासून साजू बेपत्ता -

साजू बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ हरवल्याची तक्रार दाखल केली होती. साजूबाबत लोकांना काही माहिती असल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले होते. साजूच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी सांगितले होते की, तिचे बेपत्ता होणे त्याच्यासाठी मोठा धक्का आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now