IND vs AUS 5th Test: रोहित, सिराज आणि आकाशदीपला मिळणार डच्चू ! या खेळाडूंना मिळेल संधी, सिडनी कसोटीत अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते.
Australia National Cricket Team vs India National Cricket Team: मेलबर्न कसोटीत भारतीय संघाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा 184 धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघ मालिकेत 2-1 ने पुढे आहे. त्याचवेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. मात्र, आता दोन्ही संघ शेवटच्या कसोटीसाठी सिडनीत आमनेसामने येणार आहेत. हा सामना 3 जानेवारीपासून खेळवला जाणार आहे, पण या कसोटीसाठी भारतीय संघाचे प्लेइंग इलेव्हन कोणते असतील? (हेही वाचा - IND vs AUS 4th Test 2024: मेलबर्न कसोटी पराभवानंतर रोहित शर्मा दिलं स्पष्टीकरण, काय म्हणाला घ्या जाणून...)
सिडनी कसोटीसाठी टीम इंडियाचा प्लेइंग 11 कशी असेल?
सिडनी कसोटीसाठी भारतीय संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठे बदल होणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माशिवाय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि आकाशदीप सिंग यांना प्लेइंग इलेव्हनमधून वगळले जाऊ शकते. त्याचबरोबर या खेळाडूंच्या जागी प्रसिध कृष्णा, हर्षित राणा आणि शुभमन गिल यांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला जाऊ शकतो. वास्तविक, भारतीय कर्णधार रोहित शर्मा एक फलंदाज म्हणून सतत फ्लॉप होत आहे. तर मोहम्मद सिराजची कामगिरी संमिश्र आहे.
टीम इंडियाचा संभाव्य संघ-