Cigarette Side Effects: सावधान! प्रत्येक सिगारेट पुरुषांच्या आयुष्यातील 17 आणि महिलांच्या आयुष्यातील 22 मिनिटे वाया घालवते; अभ्यासात धक्कादायक खुलासा
संशोधनातून समोर आलेला नवीन अंदाज मागील आकड्यांपेक्षा जास्त आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, प्रत्येक सिगारेट धूम्रपान करणाऱ्याचे आयुष्य 11 मिनिटांनी कमी करते.
Cigarette Side Effects: धूम्रपानाच्या (Smoking) विनाशकारी परिणामांचा (Smoking Side Effects) अभ्यास करणाऱ्या एका नवीन संशोधनात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. पुरुष प्रत्येक सिगारेटने त्यांच्या आयुष्यातील 17 मिनिटे गमावतात तर स्त्रिया 22 मिनिटे गमावतात, असं या संशोधनातून उघडकीस आलं आहे. संशोधनातून समोर आलेला नवीन अंदाज मागील आकड्यांपेक्षा जास्त आहे. ज्यात असं म्हटलं आहे की, प्रत्येक सिगारेट धूम्रपान करणाऱ्याचे आयुष्य 11 मिनिटांनी कमी करते. युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) मधील संशोधकांनी यावर अभ्यास केला. तथापी, संशोधकांनी म्हटलं आहे की, धूम्रपान करणाऱ्यांनी अस्वास्थ्यकर सवयी सोडवून नवीन वर्षाची सुरुवात केली पाहिजे.
एका सिगारेटच्या पाकिटामुळे आयुष्यातील 7 तास कमी -
अभ्यास लेखकांनी सांगितले की, धूम्रपान करणारे सामान्यत: त्यांच्या आयुष्यातील निरोगी वर्षे गमावतात. अशाप्रकारे धूम्रपान केल्याने बर्याचदा दीर्घ आजार किंवा अपंगत्व येण्याची शक्यता असते. अभ्यासात असे दिसून आले आहे की सरासरी, एक सिगारेट एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यापासून सुमारे 20 मिनिटे कमी करते. म्हणजे 20 सिगारेटचे पॅकेट एखाद्या व्यक्तीचे आयुष्य सुमारे सात तासांनी कमी करते. धुम्रपान हानीकारक आहे हे लोकांना सामान्यपणे माहीत आहे, परंतु तसं असूनही लोक धुम्रपान करतात. जे धूम्रपान सोडत नाहीत ते आयुष्यातील एक दशक गमावतात, असे UCL मधील प्रमुख संशोधन सहकारी डॉ. साराह जॅक्सन यांनी सांगितले. (हेही वाचा -Bidi is More Dangerous than Cigarette: सिगारेटपेक्षा 8 पट जास्त घातक आहे बिडी; तज्ज्ञांनी दिली माहिती, जाणून घ्या सविस्तर)
धुम्रपानाची सवय सोडल्यास वाढू शकते आयुष्य -
संशोधनाने असे सुचवले आहे की, धूम्रपान करणारे लोक जेवढ्या लवकर धुम्रपान सोडतील तेवढ्या लवकर त्यांचे आयुष्य वाढेल आणि ते निरोगी होतील. तसेच संशोधकांनी असा दावा केला की, जर एखाद्या व्यक्तीने नवीन वर्षाच्या दिवशी ही सवय सोडली तर 20 फेब्रुवारीपर्यंत तो वयाचा एक आठवडा परत मिळवू शकतो. (हेही वाचा - Cigarette Smoking: आठवड्याला 400 सिगारेट ओढणे ब्रिटनमध्ये किशोरवयीन मुलीच्या जीवावर बेतले; फुफ्फुस बंद पडले, साडेपाच तासांची शस्त्रक्रिया करावी लागली)
तंबाखूमुळे आरोग्याला धोका -
तथापि, आरोग्य आणि आयुर्मानाचा संपूर्ण लाभ मिळविण्यासाठी, धूम्रपान करणाऱ्यांनी ही सवय पूर्णपणे सोडली पाहिजे, असा पुनरुच्चार अभ्यासात करण्यात आला आहे. मागील संशोधनात असे दिसून आले आहे की, दररोज एक सिगारेट ओढणाऱ्या लोकांना हृदयविकाराचा धोका आणि स्ट्रोकचा धोका 50 टक्के कमी असतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, तंबाखूची महामारी ही जगातील सर्वात मोठ्या सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक आहे. यामुळे दरवर्षी 8 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, ज्यामध्ये अंदाजे 1.3 दशलक्ष गैर-धूम्रपान करणाऱ्या लोकांचा समावेश होतो. जगभरातील 1.3 अब्ज तंबाखू खाणाऱ्यांपैकी अंदाजे 80 टक्के लोक कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये राहतात. जेथे तंबाखूशी संबंधित रोग आणि मृत्यूचे प्रमाण सर्वात जास्त आहे.