
War Reunion: वॉर 2 हा चित्रपट येणार असल्याच्या चर्चा सध्या समोर येत आहेत. कारण 'वॉर'ची सुपरहिट टीम पुन्हा एकदा एकत्र दिसून आली आहे. नुकतेच हृतिक रोशन, टायगर श्रॉफ, वाणी कपूर आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद यांनी 'ला एकत्र हजेरी लावली होती. सिद्धार्थ आनंदने हा खास फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, "Reunion for the ages! #TeamWar". त्यानंतर चाहत्यांमध्ये 'वॉर २'ची उत्सुकता वाढली आहे. चाहत्यांनी कमेंटमध्ये 'वॉर २' आणि 'टायगर व्हर्सेस पठाण' सारख्या चित्रपटांबद्दल अपेक्षा व्यक्त केल्या. या कलाकारांना पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा अनेकजण व्यक्त करत आहेत.
या चित्रपटाची घोषणा चाहत्यांसाठी एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नव्हती, कारण 'वॉर'च्या या टीमला पुन्हा एकत्र पाहणे म्हणजे नक्कीच वॉर 2 ची घोषणा असल्याचे म्हंटले जात आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये सर्वच कलाकार अतिशय स्टायलिश दिसत आहेत.
'वॉर २'ची तयारी सुरू झाली आहे का?
View this post on Instagram
'वॉर'च्या या टीमला पुन्हा एकत्र पाहणे हे पुढच्या चित्रपटाचे संकेत देत आहे का? या भेटी मागच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. आता 'वॉर'मधली ही टीम पुन्हा एकदा धमाल करणार कि नाही हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.