Miss India USA 2021 : मिशिगनच्या 25 वर्षीय वैदही डोंगरेने जिंकला इंडिया यूएसए 2021 चा किताब
vaidehi dongre (pic credit- twitter)

मिशिगन (Michigan) येथील 25 वर्षीय वैदेही डोंगरेने (Vaidehi Dongre) 'मिस इंडिया यूएसए 2021' (Miss India USA 2021) किताब जिंकला आहे. त्याचवेळी जॉर्जियाची (Georgia) अर्शी लालानी (Arshi Lalani) दुसर्‍या क्रमांकावर आली आहे. वैदेही यांनी मिशिगन विद्यापीठातून पदवी प्राप्त केली. ती एका मोठ्या कंपनीत बिझिनेस डेव्हलपमेंट मॅनेजर म्हणून काम करते. मला आपल्या समाजावर सकारात्मक प्रभाव पडायचा आहे. तसेच महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्य आणि साक्षरतेसाठी काम करायचं आहे. असं वैदहीने मत व्यक्त केले आहे. भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकार कथक यांच्यासाठी वैदेही यांना 'मिस टॅलेन्टेड' (Miss Proficient) पुरस्कारही देण्यात आला आहे. त्यावेळी, लालानीने तिच्या आत्मविश्वासाने आणि कामगिरीने सर्वांना चकित केले होते. ती दुसर्‍या स्थानावर आली. तिला ब्रेन ट्यूमरचा त्रास होत असतानाही ही कामगिरी केल्याने तिचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे. तर उत्तर कॅरोलिनाची मीरा कासारी (Mira Kasari) हिने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे.

शनिवार आणि रविवारी ही स्पर्धा घेण्यात आली होती. मिस वर्ल्ड 1997 डायना हेडन (Diana Hayden) या स्पर्धेची प्रमुख अतिथी आणि मुख्य परिक्षक होती. 'मिस इंडिया यूएसए', 'मिसेस इंडिया यूएसए' आणि 'मिस टीन इंडिया यूएसए' अशा तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 30 राज्यांमधील 61 जणींनी सहभाग घेतला होता. यानंतर या तीन प्रकारातील विजेत्यांनाही जागतिक स्पर्धेत भाग घेण्यासाठी मुंबईला जाण्यासाठी तिकिटे देण्यात आली आहेत. वैदहीच्या कामगिरीमुळे तिच्यावर सर्व स्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे. तिच्यासाठी हा अनुभव खुपच अविस्मरणीय होता.