Nishigandha Wad (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Nishigandha Wad Health Update: ज्येष्ठ अभिनेत्री निशिगंधा वाड (Nishigandha Wad) सध्या प्रतीक शर्माच्या शोमध्ये काम करत आहेत. सुमन इंदोरी या शोच्या शूटिंगदरम्यान निशिगंधा यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. अभिनेत्रीने आपल्या तब्येतीसंदर्भात माहिती दिली आहे. निशिगंधा यांनी सांगितले आहे की, 'आम्ही मित्तल नमकीनच्या दुकानात एका सीनचे शूटिंग करत होतो आणि त्यानंतर आम्हाला दुकानातून बाहेर पडावे लागले. बाहेर पडताना माझा उजवा पाय मुरगळा आणि मी पडले. माझ्यासोबत हे कसे घडले? हे मला समजले नाही. मात्र, टीम आणि प्रत्येक क्रू मेंबर मला मदत करण्यासाठी धावले आणि मला हॉस्पिटलमध्ये नेले. जिथे माझे कुटुंब आधीच माझी वाट पाहत होते. माझी काळजी घेतल्याबद्दल मी निर्माता प्रतीक शर्मा आणि त्यांच्या टीमची आभारी आहे. त्यांनी माझी खूप काळजी घेतली आणि वेळेवर मदत केले.'

अभिनेत्रीची प्रकृती बरी होण्यासाठी एक आठवडा लागणार आहे. या विषयी सांगताना निशिगंधा म्हणाली, 'डॉक्टरांनी एक आठवडा विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मला खात्री आहे की निर्माते स्क्रिप्टमध्ये काही बदल करतील जेणेकरून मला बरे होण्यासाठी आणि शोचे शूटिंग पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ मिळेल. माझ्या उजव्या पायावर सूज आहे. त्यामुळे बरे होण्यास थोडा वेळ लागेल.' (हेही वाचा -TV Show Set Worker Electrocuted: 'अनुपमा’च्या सेटवर काम करणाऱ्या असिस्टंट लाईटमॅनचा शॉक लागून मृत्यू; कंत्राटदाराविरोधात गुन्हा दाखल)

मराठी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्यानंतर आता अभिनेत्रीने हिंदी टेलिव्हिजनमधील एक प्रमुख चेहरा म्हणून ओळख निर्माण केली आहे. निशिगंधा वाड यांनी ससुराल सिमर का, मेरी गुडिया, कभी कभी इत्तेफाक से, रब से है दुआ या लोकप्रिय शोमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या आहेत.