समर्थांच्या या ओळीतून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती स्पष्ट होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने (Shivaji Maharaj Jayanti 2022) त्यांच्या कर्तुत्वाला आणि दातृत्वाला मानवंदना देण्यासाठी ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ (Swarajya Saudamini Tararani) मालिकेच्या कलाकारांनीही सेटवर आगळी शिवजयंती साजरी केली. दांडपट्टा, काठीचे खेळ इत्यादी मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके यावेळी लहानग्यांनी सादर केली. उपस्थित कलाकारांनी छत्रपती शिवरायांना वंदन करून शिवाजी महाराजांनी आपल्यासमोर उभा केलेला आदर्श आणि शिकवण यांचे आचरण करण्याची शक्ती मिळावी अशा भावना यावेळी व्यक्त केल्या.
डॉ.अमोल कोल्हे आणि जगदंब क्रिएशन्स निर्मिती संस्थेने आजवर वेगववेगळ्या मालिकांच्या माध्यमातून हा इतिहास आपल्यापर्यंत पोहचवला आहे. येणाऱ्या प्रत्येक पिढीला हा इतिहास सांगण्याचे दायित्व आपल्याकडे आहेच. फक्त वेगवेगळ्या माध्यमातून तो अधिक जोरकसपणे पोहचवणे महत्त्वाचे असल्याचे ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ मालिकेचे निर्माते घनश्यामराव यांनी यावेळी सांगितले. (हे ही वाचा Pondicherry Marathi Movie: आयफोनवर चत्रित केलेला 'पॉंडिचेरी' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित)
View this post on Instagram
सोनी मराठी वाहिनीवरील' ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कार्तिक केंढे या मालिकेचे दिग्दर्शन करीत आहेत. या मालिकेत स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ च्या भूमिकेत स्वरदा थिगळे असून छत्रपती राजाराम राजेंची दमदार भूमिका अभिनेता ‘संग्राम समेळ’ साकाराली आहे. यतीन कार्येकर यांनी औरंगजेबाची भूमिका केली आहे.